Govt Job: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) कडून CEPTAM 11 भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, DRDO च्या या भरतीअंतर्गत एकूण 764 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. लवकरच, भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
ADVERTISEMENT
'इतकी' पदे भरली जाणार
डीआरडीओ (DRDO) म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची (Ministry of Defence) एक प्रमुख संशोधन शाखा आहे. जाहीर झालेल्या या भरतीच्या माध्यमातून एकूण 764 रिक्त जागांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये सीनिअर टेक्निकल असिस्टंट (STA B)पदासाठी 561 जागा आणि टेक्निशिअन न A (Tech A)साठी 203 पदे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहेत. पदानुसार, शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली असून विस्तृत नोटिफिकेशनमध्ये यासंबंधी उमेदवारांना अधिक माहिती मिळेल.
हे ही वाचा: तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले अन्... एकतर्फी प्रेमातून आरोपीचं भयंकर कृत्य!
कसा कराल अर्ज?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार केवळ ऑनलाइन माध्यमातून drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. एससी (SC), एसटी (ST)आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे ही वाचा: देवाला तरी घाबरा, बीडमध्ये चोरट्यांनी रात्रीतून जालिंदरनाथ मंदिरातील दानपेट्या उचलून नेल्या; पाहा व्हिडीओ
कशी होणार निवड?
या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची दोन टप्प्यांत निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात (टिअर 1) उमेदवारांसाठी कंप्यूटर आधारित परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये अधिक गुणांसह उत्तीर्ण झालेले उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात (टिअर 2) मध्ये सहभागी व्हावं लागेल. यासाठी, स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट घेतली जाईल. यानंतर, उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
ADVERTISEMENT











