देवाला तरी घाबरा, बीडमध्ये चोरट्यांनी रात्रीतून जालिंदरनाथ मंदिरातील दानपेट्या उचलून नेल्या; पाहा व्हिडीओ
Beed Crime : मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे शांतपणे आत शिरले. आधी परिसराची पाहणी करून त्यांनी दानपेट्या तोडल्या आणि काही सेकंदांतच संपूर्ण ऐवज घेऊन फरार झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवाला तरी घाबरा, बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
रात्रीतून जालिंदरनाथ मंदिरातील दानपेट्या उचलून नेल्या; पाहा व्हिडीओ
Beed Crime : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पुन्हा एकदा मंदिरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. श्री क्षेत्र येवलवाडी येथील प्रसिद्ध जालिंदरनाथ देवस्थानात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करत दोन दानपेट्या उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थानातील दानपेट्यांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा संपूर्ण कारनामा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री साधारण 1.30 वाजताच्या सुमारास घडली.
अधिकची माहिती अशी की, मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे शांतपणे आत शिरले. आधी परिसराची पाहणी करून त्यांनी दानपेट्या तोडल्या आणि काही सेकंदांतच संपूर्ण ऐवज घेऊन फरार झाले. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या फुटेजमध्ये तीनही चोरटे चेहऱ्यावर कपडा बांधून हलचाल करताना दिसत असल्याने त्यांची ओळख पटवणे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.
मंदिरात दीर्घकाळ भक्तांकडून जमा होत असलेली रक्कम, काही सोन्याचांदीची दागिने, तसेच पूजा साहित्य स्वरुपात मिळालेल्या वस्तू — मिळून दोन्ही पेट्यांमध्ये तब्बल 50 लाखांच्या आसपासचा ऐवज जमा असावा, असा प्राथमिक अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे चोरीची रक्कम मोठ्या प्रमाणात असण्याची भीती अधिकच वाढली आहे.










