Govt Job: एका प्रतिष्ठित कंपनीत मोठ्या पोस्टवर नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. NTPC (नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड) या भारत सरकारच्या मोठ्या कंपनीकडून डेप्यूटी मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहीरात careers.ntpc.co.in या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाली असून भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 7 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज करू शकतात. तसेच, 21 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या काळात उमेदवार अर्ज भरून ते सबमिट करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
एनटीपीसी लिमिटेड (NTPC) ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी आहे. यामध्ये डेप्यूटी मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल/ मॅकेनिकल/ सिव्हिल विषयात बी.ई (B.E)/ बी.टेक (B.tech) डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच, संबंधित क्षेत्रात इरेक्शन/ इंजिनिअरिंग/ डिझाइन किंवा असेंब्लीमध्ये किमान 6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे न्यूक्लिअर द्वीपमध्ये 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. यासोबतच BARC ट्रेनिंग स्कूल किंवा इतर DAE संस्थेतून एक वर्षाची ट्रेनिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.
हे ही वाचा: पाझर तलावात पोहण्यासाठी गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने 12 वर्षीय तरुण बुडाला; जालन्यातील दुर्दैवी घटना
कसं कराल अप्लाय?
1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना careers.ntpc.co.in या एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावं लागेल.
2. यासाठी एक व्हॅलिड आयडी टाकून रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट झाल्यानंतर वेबसाइटवर लॉगिन करा.
3. आता सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
4. त्यानंतर, फोटो आणि सही योग्य साइझमध्ये अपलोड करा.
5. आपल्या प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
6. शेवटी, अर्जाचं प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.
हे ही वाचा: VIDEO : पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा; नेमकं काय घडलं?
अर्जाचं शुल्क किती?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सामान्य (general)/ ईडब्ल्यूएस (EWS)/ ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC)/ एसटी (ST)/ पीडब्ल्यूबीडी (PwBD)/माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT
