Govt Job: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...

पंजाब नॅशनल बँक (PNB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या एकूण 750 पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...

मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...

मुंबई तक

• 01:25 PM • 05 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

point

मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...

PNB Recruitment 2025: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या एकूण 750 पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 23 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

किती मिळेल वेतन? 

या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 48,480 रुपये ते 85,920 रुपये वेतन दिलं जाईल. 

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार असून एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे तसेच ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात येणार आहे. याशिवाय, अपंग उमेदवारांना सुद्धा उच्च वयोमर्यादेत 10 वर्षे सूट देण्यात येईल. 

शैक्षणिक पात्रता

संबंधित पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएशन किंवा त्या संबंधित पदवी असणं अनिवार्य आहे. 

हे ही वाचा: शाळेतून घरी परतत असताना अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार! रस्त्याच्या कडेला पीडिता बेशुद्ध अवस्थेत अन्...

कशी होणार निवड? 

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रीनिंग टेस्ट, स्थानिक भाषा चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना लेखी परीक्षेत 150 गुणांसाठी बुद्धिमत्ता, कंप्यूटर अॅप्टिट्यूड, डाटा अॅनालिसिस, इंग्रजी, सामान्य ज्ञान अशा विषयांवर आधारित एकूण 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. तसेच, परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी एक-चतुर्थांश निगेटिव्ह मार्किंग असेल. पहिल्या टप्प्यात यश मिळवण्यासाठी लेखी परीक्षेत सामान्य आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 40 टक्के गुण तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 35 टक्के गुण आवश्यक आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवण्यात येईल. 

हे ही वाचा: पोटच्या मुलीवर बलात्कार करण्यासाठी आईनेच तिच्या प्रियकराला केली मदत, 'इतक्या' वर्षांचा तुरुंगवास अन् लाखो रुपयांचा दंड...

अर्जाचं शुल्क 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावं लागेल. अर्ज करण्यासाठी सामान्य (Open) प्रवर्गातील उमेदवारांना 1,180 रुपये आणि एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील तसेच अपंग उमेदवारांना 59 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. 

    follow whatsapp