मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात तिचा एक लूक समोर आला असून, तिने घातलेल्या टी-शर्टवरील संदेशाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या टी-शर्टवर ‘टीम तुकाराम मुंढे’ असे लिहिलेले दिसत आहे. 
टी-शर्टवरून व्यक्त केला पाठिंबा
ADVERTISEMENT
प्रीती झिंटा हिने काळ्या रंगाची टी-शर्ट घातली होती. त्यावर ‘टीम तुकाराम मुंढे’ असा संदेश होता. या माध्यमातून तिने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाला पाठिंबा दर्शवल्याचे दिसते.
तुकाराम मुंढे हे मुंबईतील अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि भेसळ यांविरोधात कारवाईसाठी चर्चेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.
साध्या लूकमध्ये दिसली अभिनेत्री
या खास टी-शर्टसोबत प्रीतीने निळ्या रंगाची क्लासिक जीन्स, घड्याळ आणि पांढरे स्पोर्ट्स शूज घातले होते. तिचा हा साधा आणि आरामदायी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
याआधीही सेलिब्रिटींनी केले मुंढेंचे कौतुक
प्रीती झिंटा हिच्याबरोबरच ट्विंकल खन्ना हिनेही तुकाराम मुंढे यांच्या कामाचे समर्थन केले आहे. अभिनेता मनोज बाजपेयी यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
‘वाइब’मधून पुन्हा मोठ्या पडद्यावर
दरम्यान, प्रीती झिंटा नुकतीच ‘बंटवारा 1947’ या चित्रपटात दिसली होती. आता ती तिच्या आगामी ‘वाइब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमू करत असून, तो त्यात मुख्य भूमिकेतही आहे. 
ADVERTISEMENT












