ADVERTISEMENT
पुणे, बारामती | वसंत मोरे : गेल्या चार दिवसांपासून बारामती तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालव्याचा भराव फुटल्याने लाखो लिटर पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले, ज्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. याशिवाय, काटेवाडी-भवानी नगर रस्ताही बंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस धो धो बरसणार! मुंबईत कसं आहे आजचं हवामान?
या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे आणि मदत कार्य सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा >> बारामतीमध्ये पावसाचं थैमान! निरा डावा कालवा फुटला, रहिवाशी भागांमध्ये घुसलं पाणी
दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये वरकुटे खुर्द (इंदापूर) येथे नीरा डावा कालव्यात रात्री अचानक पाणी वाढल्याने भगदाड पडले होते, ज्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आणि एक व्यक्ती जखमी झाली होती. जलसंपदा विभागाने तातडीने पाण्याचा प्रवाह कमी करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते.
ADVERTISEMENT
