आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण

Bhigwan Case : पुण्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळू लागले आहे. मुलीला पळवून नेल्याचा आरोप असलेल्या चुलत्याने भाजपचे आमदार राहुल कुल यांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवत आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात मुलीच्या आईनेही आमदार राहुल कुल यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यामुळे यातून आमदार राहुल कुल यांना घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर अझहर शेख याचे राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे तसेच हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

Bhigwan Case

Bhigwan Case

मुंबई तक

• 09:50 AM • 22 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल

point

भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण

Bhigwan Case : पुण्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळू लागले आहे. मुलीला पळवून नेल्याचा आरोप असलेल्या चुलत्याने भाजपचे आमदार राहुल कुल यांचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवत आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात मुलीच्या आईनेही आमदार राहुल कुल यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यामुळे यातून आमदार राहुल कुल यांना घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर अझहर शेख याचे राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे तसेच हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

हे वाचलं का?

भिगवण कथित अपहरण प्रकरणात संबंधित मुलीने बारामती पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सध्या मुलगी तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात असून, हे अपहरण होते की ती स्वतःहून गेली होती, याबाबतची स्पष्टता पुढील तपासातून समोर येणार आहे.

हे ही वाचा : बीड : महादेव मुंडे यांच्या मुलाला कराडच्या समर्थकाकडून मारहाण, कुटुंबियांचा आरोप; मुंडेंच्या पत्नीचे पोलिस अधीक्षकांना पत्र

अझहर शेखचे फोटो व्हायरल

आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता अंकिता पाटील आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत अझहर शेख याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये अझहर शेखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्याचा उल्लेख असून, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबतच्या फोटोमध्ये “हॅपी बर्थडे सरपंच” असा उल्लेख दिसून येतो. त्यामुळे या फोटोच्या माध्यमातून महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहे अझहर शेख?

भिगवण अपहरण प्रकरणातील आरोपी झहीर आणि आयाज शेख यांचा अझहर शेख हा चुलता आहे. व्हायरल झालेल्या फोटोमुळे अझहर शेखचे राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते या प्रकरणातील आरोपींना मदत करत होते का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा : लवकर लग्न केलं, आता टीम इंडियाच्या लेग स्पिनरचा वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी घटस्फोट, 4 वर्षांचा संसार कोर्टात संपला

अझहर सराईत गुन्हेगार

अझहर शेख हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दोन ॲट्रॉसिटीचे तर एक सरकारी कर्मचाऱ्यावर मारहाणीचा गुन्हा आहे. यापूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अझहर शेख चर्चेत आला होता. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने या प्रकरणात पुढे कोणते राजकीय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp