लवकर लग्न केलं, आता टीम इंडियाच्या लेग स्पिनरचा वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी घटस्फोट, 4 वर्षांचा संसार कोर्टात संपला

मुंबई तक

rahul chahar divorced wife ishani johar : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुष्यातील हा अध्याय अधिकृतरीत्या संपल्याचे सांगताना राहुलने स्पष्ट केले की, तो हा निर्णय रागाने किंवा पश्चात्तापाने नव्हे तर स्पष्टतेने स्वीकारत आहे. “काही नाती कायमची नसतात; ती आपल्याला जागं करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी असतात. मी आता अधिक समजूतदार आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हा शेवट नाही, तर नवी सुरुवात आहे,” असेही त्याने पोस्टमध्ये लिहिले.

ADVERTISEMENT

rahul chahar
rahul chahar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लवकर लग्न केलं

point

आता टीम इंडियाच्या लेग स्पिनरचा वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी घटस्फोट

point

4 वर्षांचा संसार कोर्टात संपला

rahul chahar divorced wife ishani johar : भारतीय क्रिकेट संघाचा लेगस्पिनर Rahul Chahar आणि त्याची पत्नी ईशानी जौहर यांचा घटस्फोट झाला आहे. जवळपास चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 9 मार्च 2022 रोजी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगद्वारे त्यांनी विवाह केला होता.

26 वर्षीय राहुलने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. कमी वयात लग्न केल्याची कबुली देत त्याने लिहिले की, त्या काळात त्याला स्वतःला आणि आयुष्याची दिशा पूर्णपणे समजली नव्हती. “मी कमी वयात लग्न केले. त्याआधी मी स्वतःला, माझी किंमत आणि मला घडवायचे असलेले आयुष्य पूर्णपणे समजून घेतले नव्हते. त्यानंतर अशी काही वर्षे आली ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. गेले पंधरा महिने कोर्टरूममध्ये गेले, जिथे संयम, ताकद आणि सत्याची ताकद काय असते? हे शिकायला मिळाली,” असे त्याने नमूद केले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुष्यातील हा अध्याय अधिकृतरीत्या संपल्याचे सांगताना राहुलने स्पष्ट केले की, तो हा निर्णय रागाने किंवा पश्चात्तापाने नव्हे तर स्पष्टतेने स्वीकारत आहे. “काही नाती कायमची नसतात; ती आपल्याला जागं करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी असतात. मी आता अधिक समजूतदार आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हा शेवट नाही, तर नवी सुरुवात आहे,” असेही त्याने पोस्टमध्ये लिहिले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1)

हेही वाचा : बीड : माजलगावच्या लॉजमधील 'त्या' खोलीत दुर्गंधी पसरली होती, दरवाजा उघडताच नको तेच... पुढे काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp