PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!

मुंबई तक

27 Jun 2023 (अपडेटेड: 27 Jun 2023, 02:30 PM)

पुण्यातील सदाशिव पेठेत सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास एक भयंकर घटना घडली. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला चढवला.

pune sadashiv peth youth scythe attack college girl

pune sadashiv peth youth scythe attack college girl

follow google news

PUNE Crime: पुणे: लग्नाला नकार दिला म्हणून मित्राने दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात (Pune) अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीने बोलणं बंद केलं म्हणून मित्राने भर रस्त्यात तिच्यावर कोयत्याने वार (Fatal Attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth) पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून तरुणाने हल्ला केल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलं आहे. (pune sadashiv peth youth scythe attack college girl cctv footage crime news 18 year old accused)

हे वाचलं का?

पुण्यातील सदाशिव पेठेतील थरार…

शंतनू जाधव असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरुन चालले असताना हल्लेखोर तरुणाने त्यांना थांबवले, काही क्षणातच त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. हल्ला झाल्यानंतर तरुणी जीव मुठीत घेऊन धावायला लागली. यावेळी आरोपी शंतनूने तिच्यावर डोक्यावर कोयत्याने वार केला. ज्यानंतर ती जमिनीवर कोसळली. सुरुवातीला तिच्या मदतीला कोणी आलं नाही. मात्र, त्यानंतर रस्तावरील काही नागरिक मुलीच्या दिशेने धावून आले. जखमी अवस्थेत मुलगी धावत असताना लेशपाल जवळगे हा तरुण त्या तरुणीच्या मदतीला आला.

हे ही वाचा>> राहुल हांडोरेने पुण्यातच रचलेला दर्शना पवारच्या हत्येचा कट?, ‘त्या’ दुकानामुळे…

कोयता हातात असलेला तरुण तरुणीवर वार करणार इतक्यात लेशपालने त्याच्या हातातील कोयता पकडला. त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. त्यानंतर इतर नागरिकांनी त्या हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

भर रस्त्यात तरुणी आणि तिच्यासोबतच्या मित्रावर हल्ला

 

‘त्याच्या घरच्यांना सांगितलं म्हणून…’, पाहा पीडित मुलगी काय म्हणाली

‘तो माझा मित्र होता.. मी त्याला नाही म्हटलं म्हणून त्याने मला जीवे मारण्याची धमकी देत होता. फोन करायचा.. कॉलेजपाशी येऊन मला मारहाण करायचा.. सतत पाठलाग करायचा. त्याच्या घरच्यांना देखील मी याबाबत सांगितलं होतं. पण त्यांनी त्यावर काहीच केलं नाही. मी त्याच्या घराच्यांना सांगितलं या रागातून त्याने आज माझ्यावर वार केले. यामध्ये माझ्या डोक्याला टाके पडले आहेत. माझा काही दोष नसताना त्याने मला धमकी देत होता.’

हे ही वाचा>> Dombivli Crime: भयंकर… चाकू हातात घेत मित्राचा पाठलाग, हत्येचं कारण काय?

‘मी आज कॉलेजला जात होते तेव्हा तो मला थांब-थांब सांगत होता. पण मी थांबले नाही म्हणून त्याने माझ्यावर कोयत्याने वार केले. आम्ही कॉलेजमध्ये मित्र होतो. पण मी त्याच्याशी बोलणं बंद केल्याने आज असं कृत्य केलं.’ असा जबाब पीडित मुलीने यावेळी दिला आहे.

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने वाचवलं

हल्ला करण्यात आलेली तरुणी ही अवघ्या 18 वर्षांची असून ती पदवीच्या पहिल्या वर्षाला आहे. तर तिच्यावर हल्ला करणारा आरोपी शंतनू जाधव हा तिच्याच वर्गातील आहे. तसेच तरुणीचा बचाव केले ज्या मुलाने केला तो तरुण सध्या MPSC परीक्षेची तयारी करत असल्याचं समजतं आहे. या तरुणावर देखील शंतनूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानेच वेळीच शंतनूच्या हातून कोयता काढून घेतला.

दरम्यान, पुण्यात प्रेम प्रकरणातून हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात तपासात आणखी कुठले खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp