दुसऱ्या मुलाला बोलत असल्याचा राग, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात घातला हातोडा, रायगडमधील घटना

Raigad Crime : दुसऱ्या मुलाला बोलत असल्याचा राग, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात घातला हातोडा, रायगडमधील धक्कादायक घटना

Mumbai Tak

मुंबई तक

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 10:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या मुलाला बोलत असल्याचा राग

point

संतापलेल्या प्रियकराने डोक्यात हातोडा घातला

Raigad Crime : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलिबागमधील कणकेश्वर मंदिर परिसरात प्रियकराने त्याच्या प्रेयसीची डोक्यात हातोडा घालून तिला गंभीररित्या जखमी केल्याची माहिती समोर आलीये. दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला, त्यानंतर संतापलेल्या प्रियकराने बॅगेतील हातोडा काढला आणि प्रेयसीच्या डोक्यात घातला. संचिता विनायक सलामत ( वय 21) असं जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी सुरज शशिकांत बुरांडे (वय 28) या प्रियकराला अटक केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी बेदरकारपणे वागणारा इशित नेमका आहे तरी कुठला?

प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय 

अधिकची माहिती अशी की, कणकेश्वर मंदिर परिसरात बसलेल्या प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला. प्रेयसी संचिता सलामत दुसऱ्या एखाद्या तरुणाशी बोलत होती. यामुळे तिचा प्रियकर सुरज बुरांडे संतापला. त्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने बॅगेतून लोखंडी हातोडा काढला. त्याने संचिताच्या डोक्यावर आणि कपाळावर जोरदार वार केले. त्यानंतर आरोपीने तिला जवळच्या तारेच्या जाळीत ओढून नेऊन दगडाने मारहाण केली. संचिता गंभीर जखमी झाली आणि ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली, तरीही तिला तिथे जवळपास तीन तास मदत मिळाली नाही.

हेही वाचा : पुरुषांसोबत लव्ह, नंतर से#, व्हिडिओ रेकॉर्ड करत ब्लॅकमेल अन् पैसे उकळायची, पोलिसांनी उघडं पाडलं पितळ

घटना समजताच अलिबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. जखमी तरुणीला तात्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुरजवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा (भा.दं.सं. कलम 307) दाखल केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. प्रेमसंबंधांतील संशययामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने परिसरात तातडीची सुरक्षितता निर्माण झाली असून, जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत आणि आरोपीविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजता कॅम्पसच्या बाहेर कशी गेली?..' अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जींचा कॉलेज प्रशासनाला सवाल

    follow whatsapp