MNS : मुलुंड प्रकरणानंतर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून फटकारले, ‘राजधानी हातातून गेली…’

प्रशांत गोमाणे

30 Sep 2023 (अपडेटेड: 30 Sep 2023, 01:13 PM)

मराठी असल्याने तृप्ती देवरूखकर या महिलेला एका गुजराती व्यक्तीने जागा नाकारल्याच्या घटनेने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आता राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत मराठी अस्मितेला हात घातला आहे.

raj thackeray cartoon on marathi identity trupti deorukhkar not allowed office space mulund case

raj thackeray cartoon on marathi identity trupti deorukhkar not allowed office space mulund case

follow google news

मराठी असल्याने तृप्ती देवरूखकर या महिलेला एका गुजराती व्यक्तीने जागा नाकारल्याच्या घटनेने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेऊन आक्रमक पावित्रा घेतला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणात मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील, असा दमच भरला होता. यानंतर आता राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत मराठी अस्मितेला हात घातला आहे. तसेच मराठी अस्मिता कशी ठिगळं लावलेल्या अवस्थेत आहे, हे व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आहे. (raj thackeray cartoon on marathi identity trupti deorukhkar not allowed office space mulund case)

हे वाचलं का?

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांचे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये तमिळ, बंगाली, गुजराती, पंजाबी अस्मिता दर्शवणाऱ्या महिलांचे चित्र रेखाटलण्यात आले आहे. त्याचसबोत मराठी अस्मिता दर्शवणारी महिलाही दाखवण्यात आली आहे. यामध्ये मराठी अस्मिता दर्शवणारी महिला ठिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवलं आहे. मराठी अस्मिता ब्राम्हण, आगरी, मराठा, दलित, माळी, मातंग, वंजारी आणि इतर जांतीमध्ये कशी विभागली आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केला आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले ‘OBC ना…’

दरम्यान राज ठाकरे यांनी याआधी ट्वीट करून या घटनेवर संताप देखील व्यक्त केला होता. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील, असा इशाराच दिला. तसेच सरकारने देखील आपला धाक दाखवावा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.https://www.mumbaitak.in/wp-admin/admin.php?page=wpseo_workouts

मुलुंडमध्ये मराठी महिलेला व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध व्यक्त केला, पण आम्हाला निषेध नोंदवणं हा प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी भूमिका घेतती त्याचे मनापासून अभिनंदन करतो, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : One Nation-One Election: 2024 मध्ये ‘एक देश-एक निवडणूक’ होणार? मोठी बातमी आली समोर…

मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे आणि जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

    follow whatsapp