Viral Story: शरीरात अर्धा लिटर विष… तब्बल 5000 इंजेक्शन देऊन वाचवला शेतकऱ्याचा जीव!

रोहित गोळे

• 10:58 AM • 07 Sep 2023

एका शेतकऱ्याच्या शरीरातून तब्बल अर्धा लीटर किटकनाशक गेल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी त्याला तब्बल 5000 हजार इंजेक्शन देऊन त्याचे प्राण वाचवले.

rajasthan viral story farmers condition worsened after half a liter of pesticide passed through his body doctor gave him as many as 5000 thousand injections and saved his life

rajasthan viral story farmers condition worsened after half a liter of pesticide passed through his body doctor gave him as many as 5000 thousand injections and saved his life

follow google news

Farmer Pesticide: पाली (राजस्थान): राजस्थानच्या (Rajasthan)पालीमध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे पीक वाचवण्यासाठी एक शेतकरी आपल्या शेतात कीटकनाशक (pesticide) फवारत होता. त्यानंतर ते कीटकनाशकही त्याच्या शरीरात गेले. यामुळे तो आजारी पडला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. हे कीटकनाशक इतके विषारी होते की त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. (rajasthan viral story farmers condition worsened after half a liter of pesticide passed through his body doctor gave him as many as 5000 thousand injections and saved his life)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

प्रचंड प्रमाणात विषारी किटकनाशकं शेतकऱ्याच्या शरीरात गेल्याने त्याच्या जगण्याची शक्यता फारशी कमी नव्हती. पण डॉक्टरांनी धीर सोडला नाही. पेशंटचे प्राण वाचवण्यात त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं. तब्बल 24 दिवस या रुग्णावर उपचार सुरू होते. या संपूर्ण 24 दिवसात रुग्णाला 5000 इंजेक्शन देण्यात आले. आता तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याच्या शरीरात एकूण 600 ML कीटकनाशक गेलं होतं. जे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे त्याचे प्राण देखील बचावले आहेत.

हे ही वाचा>> Amravati Crime Illicit relationship : वहिनीवर दिराचे जडले प्रेम अन् पुतण्यालाच…

डॉ. प्रवीण गर्ग यांच्या टीमने सर्वप्रथम रुग्णाच्या गळ्यात छिद्र करून त्याला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. कारण रुग्णाला श्वासही घेता येत नव्हता. मग त्यांनी त्याला अँटीडोट औषध एट्रोपीनचे इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. रुग्णाला दररोज 208 इंजेक्शन देण्यात आले. जेणेकरून विषाचा प्रभाव संपुष्टात येईल. यासोबतच रुग्णाला औषधेही देण्यात आली.

रुग्णाला 24 दिवस डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात आले. हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारली. त्यानंतर 24 दिवसांनी रुग्ण पूर्णपणे निरोगी झाल्याची खात्री झाल्यानंतरच डॉक्टरांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.

हे ही वाचा>> Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरूणाची आत्महत्या, तळ्यात उडी घेऊन संपवलं जीवन

यापूर्वी अमेरिकेतही अशीच एक घटना समोर आली होती. जेथे 300 मिली कीटकनाशक एका व्यक्तीच्या शरीरात गेले होते. त्याला आठ दिवस 760 इंजेक्शन देण्यात आले. पण राजस्थानातील ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ असल्याचं समजतं आहे.

विषारी किटकनाशकांमुळे महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी गमावला होता जीव

दरम्यान, साधारण 2-3 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना शेतीत फवारणी करताना विषारी किटकनाशकांची बाधा होऊन त्यांना आपला जीव गमावावा लागला होता. त्यावेळी हा मुद्दा प्रचंड गाजला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर विषारी किटकनाशकांच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यास बरीच मदत झाली.

    follow whatsapp