Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरूणाची आत्महत्या, तळ्यात उडी घेऊन संपवलं जीवन

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange patil agitation dharashiv osmanabad boy commit suicide for maratha reservation
manoj jarange patil agitation dharashiv osmanabad boy commit suicide for maratha reservation
social share
google news

गणेश जाधव, धाराशीव : 

Dharashiv boy commit suicide for maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सूरू आहेत. या आंदोलना दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत वामन माने (35) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. धाराशीवमध्ये (Dharashiv) ही धक्कादायक घटना घडली आहे. या आत्महत्येनंतर आता धाराशीवमधील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे.(manoj jarange patil agitation dharashiv osmanabad boy commit suicide for maratha reservation)

धाराशीवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आऱक्षणासाठी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उमरगा तालुक्यातील माडज गावात राहणाऱ्या चंद्रकांत माने या तरूणाने तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपुर्वी तरुणाने मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत तलावात उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्येने मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान चंद्रकांत माने यांच्या आत्महत्येनंतर आता स्थानिक मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाने या प्रकरणाने आक्रमक पावित्रा घेत उमरगा उपविभाग अधिकारी कार्यालयासमोर चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Air hostess murder : चिरलेला गळा,रक्ताने माखलेली फरशी; रुपल ओगरेच्या हत्येची CCTV त कैद झाली स्टोरी

जालन्यात 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजासा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी उपोषणाला सुरूवात केली होती. या उपोषणावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या लाठीचार्जनंतर आंदोलन चांगलेच पेटले होते. या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अनेकदा सरकारने केला होता. मात्र तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे.

दरम्यान या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने बुधवारी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय़ घेतला होता. ज्यांच्याकडे कुणबी म्हणून वंशावळीच्या नोंदी असतील, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जातील, असा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काही बदल सुचवत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.

ADVERTISEMENT

सरकारने चांगला निर्णय घेतला आहे, पण ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, असा उल्लेख आहे. आमच्याकडे कुणाकडेच वंशावळीचे दस्ताऐवज नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही”.त्यामुळे आमची मागणी मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र द्यावेत,अशी असल्याचे आज उपोषणाच्या दहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : OBC Reservation : मराठा की ओबीसी? मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय झाला?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT