'या' रिसेप्शनिस्टच्या बँक खात्यात अचानक आले 3 कोटी 43 लाख, आधी सगळी मजा केली आणि आता खेला होबो...

Today Shocking Viral News : अमेरिकेत घोड्यांच्या क्लिनीकमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला प्रचंड पैसा मिळाला. तिच्या बँक खात्यात अचानक 3 कोटी 43 लाख रुपये जमा झाले.

Receptionist Woman Shocking News Viral (फोटो सौजन्य - फेसबुक)

Receptionist Woman Shocking News Viral (फोटो सौजन्य - फेसबुक)t Woman Shocking News Viral

मुंबई तक

07 Jul 2025 (अपडेटेड: 07 Jul 2025, 09:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

येसिका अरुआच्या खात्या 3 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली अन्..

point

येसिकाच्या आईने अर्जेंटिनात राहणाऱ्या कुटंबियांना पाठवली रक्कम

point

घोंड्याच्या क्लिनिकमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking Viral News : अमेरिकेत घोड्यांच्या क्लिनीकमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला प्रचंड पैसा मिळाला. तिच्या बँक खात्यात अचानक 3 कोटी 43 लाख रुपये जमा झाले. कोणीही कोणंतही ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्यामुळे या महिलेनं 11 महिने खूप मौजमजा केली. तिने नवीन घर खरेदी केलं. महागड्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली. लक्झरी वस्तुंची शॉपिंग केली..पण एक दिवस या महिलेच्या पर्दाफाश झाला आणि ती जेलमध्ये गेली. तिच्याकडे खात्यात जमा झालेले पैसे परत मागण्यात आले. पण तोपर्यंत तिने ते पैसे एन्जॉय करून उडवले होते. या महिलेच्या खात्यात जास्त पैसे जमा का झाले? जाणून घ्या सविस्तर माहिती..

हे वाचलं का?

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, येसिका अरुआ नावाची ही महिला फ्लोरिडात घोड्यांच्या एका क्लिनीकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. येसिका तिच्या पहिल्या महिन्याच्या पगाराची वाट पाहत होती. पण जेव्हा तिच्या मोबाईलवर सॅलरीचा मेसेज आला, तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या खात्यात सॅलरीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली होती.

हे ही वाचा >>महाराष्ट्रातील जनतेला डिवचणारे भाजपचे दुबे आहेत तरी कोण? दुबेंचं ते विधान जसंच्या तसं...

येसिकाच्या खात्यात जमा झालेल्या पैशांचं नंतर काय झालं?

येसिकाने तिला मिळालेल्या पैशांबाबत कोणालाही सांगितलं नाही. प्रत्येक महिन्यात तिच्या खात्यात सॅलरीपेक्षा जास्त पैशे जमा होत होते. ती या पैशातून मौजमजा करायची. फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत तिच्या खात्यात 3 कोटी 43 लाख,80 हजार रुपये (400,000 डॉलर) जमा झाले. वर्ष 2023 च्या सुरुवातीलाच कंपनीच्या डायरेक्टरला याबाबत कळलं. अरुआच्या खात्यात जी रक्कम जमा होत होती, तो क्लिनीकच्या डॉक्टरचा पगार होता.

डॉक्टरचा पगार चुकून अरुआच्या खात्यात जमा होत होता. डॉक्टरने एक वर्ष त्यांचा सॅलरी अकाऊंट चेक केला नाही. जेव्हा त्यांचे क्रेडिट कार्ड्स कॅन्सल झाले, तेव्हा त्यांना याबाबत कळलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकाराबाबत सांगितलं. पोलिसांनी आरुआकडे चौकशी केली, तेव्हा तिने खात्यात जास्त पैसे येत असल्याचं कबूल केलं. हे रिसेप्शनिस्टच्या कामाचं बोनस आहे, असं तिला वाटलं होतं.

हे ही वाचा >>Nagpur: पत्नीला लागलेली अनैतिक संबंधांची चटक, लकवा मारलेला पती आड यायचा म्हणून थेट...

डॉक्टरने अरुआला याबाबत विचारलं, तेव्हा ती रडू लागली. तिने तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर डॉक्टरला 1 कोटी 66 लाख रूपये चेकच्या माध्यमातून परत दिले. तिने म्हटलं की, बाकी पैसे ती परत देऊ शकत नाही. कारण तिच्या आईने 83 लाख रुपये अर्जेंटिनामध्ये कुटुंबियांना पाठवलं होतं. अरुआवर क्लिनीकची मोठी चोरी आणि मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे.

    follow whatsapp