फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, काही दिवसांपूर्वीच केलेली वरिष्ठांकडे तक्रार; नेमकं काय घडलं?

Satara Crime : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, काही दिवसांपूर्वीच केलेली वरिष्ठांकडे तक्रार; नेमकं काय घडलं?

Mumbai Tak

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 11:07 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या

point

काही दिवसांपूर्वीच केलेली वरिष्ठांकडे तक्रार; नेमकं काय घडलं?

Satara Crime :  साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये जात आत्महत्या केल्यामुळे फलटण परिसरात तसेच वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. काही दिवसांपूर्वीच या डॉक्टरने माझ्यावर अन्याय होत असल्याचं म्हणत वरिष्ठांकडे तक्रार केली होती.

हे वाचलं का?

चौकशीमुळे महिला डॉक्टर मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा 

मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी त्यांचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमुळे आणि सततच्या दबावामुळे त्या मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा होती.

हेही वाचा : पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकार

फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर

महिला डॉक्टरने यापूर्वी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” असा इशाराही दिला होता. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी शेवटी टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसत आहे. फलटणमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं असून, रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तथापि, आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

डॉ. मुंडे यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप आणि दु:खाचे वातावरण आहे. सहकारी डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “एक समर्पित आणि प्रामाणिक डॉक्टर अशा प्रकारे जगाचा निरोप घेतील, हे विश्वास बसणारं नाही,” अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. फलटण पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आत्महत्येच्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी सेवांतील दबाव, अंतर्गत राजकारण आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर चर्चा रंगू लागली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दीड महिन्यांपासून पत्नीचा पतीसोबत वाद, समजूत काढण्यासाठी तो आला घरी, स्वत:वर डिझेल ओतत घेतलं पेटवून

    follow whatsapp