फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आतेभावाने फोडलं बिंग, घटनेचे धागेदोरे बड्या नेत्याशी?

satara crime news : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणात एका मोठ्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याची चर्चा आहे. पीडितेच्या आतेभावाने संबंधित पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याबाबत राजकीय दबाव टाकला जात असल्याचा खुलासा केला होता. 

crime news

crime news

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 06:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मृत डॉक्टरच्या आतेभावाचा धक्कादायक दावा

point

पीएंच्या फोनवरून खासदाराची चर्चा

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर या प्रकरणात एका मोठ्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याची चर्चा आहे. पीडितेच्या आतेभावाने संबंधित पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याबाबत राजकीय दबाव टाकला जात असल्याचा खुलासा केला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना हादरलं! भररस्त्यात उद्योगपतीवर 'त्या' रात्री प्राणघातक हल्ला, रोहित पवारांनी 'x' ट्विटमधून घेतला समाचार

मृत डॉक्टरच्या आतेभावाचा धक्कादायक दावा 

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरच्या आतेभावाने केलेल्या खुलाश्याने पोलीस चांगलेच अडचणीत आलेत. या घटनेचे धागेदोरे एक बड्या राजकीय नेत्याशी लावले जात आहे. महिला डॉक्टरच्या आतेभावाने खळबळजनक दावा केला की, दोन महिन्यांपूर्वी पीएंच्या फोनवरून खासदार बोलत असल्याची तक्रार डॉक्टरांनी पोलिसांकडे केली, तसं पत्रही देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

दरम्यान, या महिला डॉक्टरची सख्खी बहीण देखील वैद्यकीय अधिकारी आहे. तिने फोनवरून तिला पोस्टमॉर्टम बदलण्यासाठी राजकीय नेते दबाव आणण्याचे काम करत असतात अशी कल्पनाच देऊन ठेवली होती. परंतु, अन्य काही गोष्टींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानं आपल्या बहिणीला सांगितलं नसल्याचा दावा आतेभावाने केला. 

खासदाराचा प्रकरणाशी छडा  

खासदार दोन पीएंच्या फोनवरून आपल्याशी चर्चा करत होते, अशी लेखी स्वरुपातही तक्रार पोलिसांकडे दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, डॉक्टरने खासदार असा उल्लेख केल्यानं नेमकं कोणत्या खासदाराचा या प्रकरणाशी संबंध होता याचा छडा आता पोलीस लावत आहेत. 

हे ही वाचा : बाप तो बाप रहेगा! शेतकरी बापाने लेकीसाठी 40 हजारांची नाणी बचत करत विकत घेतली स्कूटी, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

दरम्यान, यापूर्वीही कारवाई केली असता, त्यावर कसलीही कारवाई केली गेला नाही, असा प्रश्न महिला आयोगाने उपस्थित केला आहे. एकंदरीत महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा संबंध पोलिसांशीच आहे.  

    follow whatsapp