Shakti Cyclone, रत्नागिरी : अरबी समुद्रात सध्या शक्ती चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळामुळे राज्य प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे राज्य प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेता रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई आणि कोकण किनारपट्टीला या वादळाचा मध्यम तीव्रतेचा फटका बसू शकतो.
ADVERTISEMENT
सध्या तरी या चक्रीवादळाचा थेट परिणाम किनारपट्टीवर दिसून आलेला नाही. तथापि, पुढील काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोकणातील अनेक भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे. ‘शक्ती’ वादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत असून, खोल समुद्रात त्याचा जोरदार परिणाम राहणार आहे.
हेही वाचा : परभणी : सहलीला गेलेल्या विद्यार्थींचा शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर अन् संतापजनक कृत्य
प्रशासनाकडून मच्छीमारांना महत्त्वाचं आवाहन
खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 50 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या सूचनांनुसार, काही वेळा समुद्रकिनारी वादळी वारे आणि पावसाच्या सरींचा अनुभव येऊ शकतो.
हवामानातील बदल लक्षात घेता खबरदारी घेणे अत्यावश्यक
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या किनारपट्टीवरील वातावरण शांत असले तरी, पुढील काही दिवस हवामानातील बदल लक्षात घेता खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता. या चक्री वादळामुळे हा पाऊस कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसू शकतो. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
6 ऑक्टोबरपासून विष योग निर्माण होणार, याचा काही राशीतील लोकांना धोका मिळणार, काय सांगतं राशीभविष्य?
ADVERTISEMENT
