मुंबई: कसोटी मालिकेनंतर शुभमन गिल भारताच्या एकदिवसीय संघाचा (One Day Team) कर्णधारही बनला आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी वनडे आणि टी-20 संघांची घोषणा केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत आश्चर्यकारकरित्या रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटविण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा आता केवळ एक फलंदाज म्हणून संघात असेल.
ADVERTISEMENT
रोहित शर्मा कर्णधारपदावरून स्वत: पायउतार झाला की, त्याला काढून टाकण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट नाही. तथापि, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या विधानावरून असे सूचित होते की, त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले असावे. टीमची घोषणा करताना अजित आगरकर यांनी जोर देऊन सांगितले की, निवडकर्ते तिन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र कर्णधार ठेवण्याच्या बाजूने नव्हते.
हे ही वाचा>> रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; भारताचं नेतृत्व कोण करणार?
अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असणे जवळजवळ अशक्य आहे. वनडे क्रिकेट सध्या सर्वात कमी खेळले जाणारे फॉरमॅट आहे. आमचे लक्ष आगामी टी-20 वर्ल्ड कपवर आहे. आम्हाला गिलला जुळवून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे."
'रोहित आणि विराट पूर्णपणे तंदुरुस्त'
अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल सांगितले की, "विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघात सामील होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. आम्ही नेहमीच निवडलेल्या खेळाडूंची नावे सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) ला पाठवतो आणि त्यांच्या फिटनेसची पुष्टी करतो." अजित आगरकर यांनी असेही म्हटले की, रोहित शर्मा किंवा विराट कोहली दोघेही 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी वचनबद्ध नाहीत.
हे ही वाचा>> Asia Cup 2025: पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून देणारा Team इंडियाचा तिलक वर्मा आहे तरी कोण?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव ज्युरेल (यष्टीरक्षक)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा T20 संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.
ADVERTISEMENT
