5 वर्षाच्या पुतण्याने काकाला 'त्या' महिलेसोबत 'नको त्या' अवस्थेत पाहिलं, काकाने मुलासोबत..

मुंबई तक

08 Jun 2026 (अपडेटेड: 09 Jun 2026, 01:09 AM)

Solapur crime : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर गावात सख्ख्या काकाने पाच वर्षीय चिमुकल्या पुतण्याची दुर्दैवीपणे हत्या केली. आपले अनैतिक प्रेमसंबंध उघड होतील या भीतीने काकानेच पुतण्याचा काटा काढला. संबंधित हत्येची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

Crime News

प्रातिनिधिक फोटो (AI)

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आजीचा लाडका समर्थ नाहक मारला गेला

point

काकाने समर्थ पत्र्यावरून पडल्याचा खोटा बनाव रचला

Solapur Crime : विजय बाबर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर गावात पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सख्ख्या काकाने पाच वर्षीय चिमुकल्या पुतण्याची दुर्दैवीपणे हत्या केली. आपले अनैतिक प्रेमसंबंध उघड होतील या भीतीने काकानेच पुतण्याचा काटा काढला. संबंधित हत्येची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...

आजीचा लाडका समर्थ नाहक मारला गेला

मृत मुलाची समर्थ यल्लप्पा कास्तार (वय 5) अशी ओळख समोर आली. समर्थ हा आपल्या आजीसोबत राहत होता, तो काकाकडे जातो असे सांगून घरातून गेला आणि परतलाच नाही. पण काही वेळानंतर काका अंकुश कास्तारने (वय 25) बेशुद्ध झालेल्या समर्थला ताब्यात घेत आजीच्या घराकडे आणलं. समर्थची परिस्थिती पाहून त्याला बरूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु समर्थच्या उपचारापूर्वी त्याचा दुर्दैवी अंत झाला. 

हे ही वाचा : राजेंद्र राऊत म्हणाले, अकलूजच्या चौकात विजयी सभा घेणार, आता मोहिते पाटलांंचं प्रत्युत्तर

काकाने समर्थ पत्र्यावरून पडल्याचा खोटा बनाव रचला

काका अंकुशने खोटा बनाव रचून समर्थ पत्र्यावरून पडल्याचं सांगितलं. अंकुशने समर्थ पत्र्यावरून पडल्याची खोटी माहिती सांगून त्याच्या हत्येबाबतची माहिती लपवली. या गंभीर स्थितीत समर्थच्या मानेवर आणि हनुवटीसह डोळ्यावर मोठ्या जखमा होत्या.

मंद्रुप पोलीस शंकर पटवारी यांनी तपास करत समर्थच्या काकावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचा तपास केला असता, आरोपी अंकुशने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. पोलीस चिमुकल्या समर्थच्या हत्येचं कारण शोधत आहेत. अंकुशचे कोणत्या तरुणीशी प्रेमसंबंध होते, याचा पोलीस तपास करत आहेत.