लग्नानंतर नवऱ्याला जवळही येऊ दिलं नाही; सोनमने असं का केलं? म्हणाली, "कामाख्या देवीच्या दर्शनानंतर..."

मुंबई तक

• 10:36 AM • 11 Jun 2025

सोनम आणि राजा रघुवंशीच्या प्रकरणाबद्दल नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. लग्नानंतर सोनमने नवऱ्याला जवळही येऊ दिलं नाही. सोनमचं नेमकं काय मत होतं? जाणून घ्या.

लग्नानंतर नवऱ्याला जवळही येऊ दिलं नाही; सोनमने असं का केलं?

लग्नानंतर नवऱ्याला जवळही येऊ दिलं नाही; सोनमने असं का केलं?

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोनमने लग्नानंतर नवऱ्याला जवळही येऊ दिलं नाही

point

लग्नानंतर नवऱ्याला स्पर्श करु न देण्यामागे सोनमचं मत काय?

point

सोनम नेमकं काय म्हणाली?

Sonam and Raja Raghuwanshi: सोनम आणि राजा रघुवंशीच्या लग्नाला काही दिवसच झाले होते. त्या दोघांच्या प्रेमामध्ये जरी विश्वास असला तरी त्या दोघांमध्ये वेगळंच अंतर होतं आणि हे अंतर राजाच्या पत्नीने म्हणजेच सोनमने निर्माण केले होते. पोलिसांनी माहितीनुसार, लग्नानंतर सोनमने राजाला स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत ते दोघेही कामाख्या देवीचे दर्शन घेत नाहीत तोपर्यंत ती त्याच्या जवळ येणार नाही. लग्नानंतर सोनमने राजाला तिला स्पर्शही करू दिला नाही. राजानेही सोनमची श्रद्धा विचारात घेऊन तिचं म्हणणं मान्य केलं. 

हे वाचलं का?

माहेरीच हत्येचं प्लॅनिंग

सोनमने तिच्या माहेरी राहून राजाला मारण्याचं संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं. 15 मे रोजी ती तिच्या माहेरी गेली आणि तिथे तिने गुवाहाटीला जाण्यासाठी तिकीट बुक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्याशी फोनवर सतत संपर्कात होती. सोनम आणि राज यांनी मिळून राजाला मेघालयात नेऊन त्याला संपवण्याची योजना आखली होती.

क्राइम ब्रांचला मिळालेल्या माहितीनुसार, राजाला संपवण्याच्या प्लॅनिंगमध्ये सोनमचे मित्र विशाल, आनंद आणि आकाश सुद्धा सहभागी होते. त्यावेळी जर तिच्या मित्रांना राजाला मारुन टाकणं शक्य झालं नाही तर ती स्वतः राजाला फोटो काढण्याच्या बहाण्याने खड्ड्यात ढकलेल, असं सोनमने राजला सांगितलं होतं. इतकेच नव्हे तर हा कट उघड झाल्यास नेपाळला पळून जाण्याची योजना सुद्धा त्यांनी आखली होती. 

हे ही वाचा: माहेरहून गाय आण, स्कुटीसाठी पैसे आण म्हणत सासरच्यांनी छळलं, सुनेनं विहिरीत उडी मारून...

कामाख्या मंदिराकडून मेघायलकडे 

कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर सोनमने राजाला मेघालय इथे जाण्याचं सुचवलं. राजाला डोंगरांची ठिकाणे आवडत नव्हती पण तरीही पत्नीच्या म्हणण्यानुसार, तो तिथे जाण्यास तयार झाला. सोनमने फिरण्याचं ठिकाणच नव्हे तर तिथे जाण्याची सर्व व्यवस्था सुद्धा स्वत:च ठरवली. इंदौर क्राइम ब्रांचच्या सूत्रांनुसार, लग्नानंतर एका आठवड्यातच सोनमने राजाच्या हत्येचं पूर्ण प्लॅनिंग केलं होतं. सोनमला काहीही झालं तरी राजाला संपवायचं होतं, असा सूत्रांनी दावा केला. 

हे ही वाचा: घरासमोर वाळू टाकल्यानं वाद, डोक्यात वीट घातली, तरूणाचा अंत... जालन्यात हादरवून टाकणारी घटना

23 मे रोजी राजा आणि सोनम मेघालयातील नोंगरीहाट गावात पोहचले. त्यावेळी एका सूनसान जागी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांनी राजावर हल्ला केला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार, राजाच्या डोक्यावर पुढे आणि मागे दोन धारदार शस्त्रांनी वार केले गेले. 

हत्येनंतर सोनम बेपत्ता झाली होती. ती आता 25 ते 27 मे पर्यंत ती इंदौरच्या देवास नाका परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपून राहिली. खून प्रकरणातील आरोपी विशालचे रक्ताने माखलेले कपडे त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत, जे आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.