Jyoti Malhotra Latest Video Viral : हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा Travel with JO नावाचं यूट्यूब चॅनल चालवते. परंतु, पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली ज्योतीला अटक करण्यात आली आहे. तिचे पाकिस्तानी हाय कमिशनच्या दानिश नावाच्या अधिकाऱ्यासोबत खूप जवळचे संबंध होते, ज्या व्यक्तीची भारत सरकारने देशातून याआधीच हकालपट्टी केली आहे, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
ADVERTISEMENT
इफ्तार पार्टीच्या व्हिडीओमुळे गुपित बाहेर आलं
ज्योती म्हल्होत्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ तिच्या विरोधात पुरावा बनला आहे. या व्हिडीओत ती पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये झालेल्या इफ्तार पार्टीत त्याच पाकस्तानी अधिकाऱ्यासोबत दिसते, ज्याला हेरगिरीच्या आरोपाखाली पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित करण्यात आला होता.
हे ही वाचा >> शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात 'बीड बंद'ची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
तपास यंत्रंणांच्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याचं नाव एहसान-उर-रहिम उर्फ दानिश आहे. वर्ष 2023 मध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती. तेव्हा एक व्हिजा एजंटच्या माध्यमातून तिची ओळख दानिशसोबत झाली होती. त्याचदरम्यान ज्योतीचे पाकिस्तानी एजन्सीसोबत कनेक्शन बनले होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत समोर आलं की, ज्योती दानिशसोबत पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये दिसली. ती कॅमेरासमोर म्हणते, त्यांना पाहून मी आनंदी आहे.
त्यानंतर दानिशने ज्योतीची पाहूण्यांसोबत ओळख केली. हीचं नाव ज्योती आहे. ती एक यूट्यूबर आणि व्लॉगर आहे. तिचा ट्रॅव्हल विथ जो नावाचा चॅनल आहे आणि तिचे 100 K हून अधिक फॉलोअर्स आहेत, असं दानिश त्या पाहूण्यांना सांगतो. दरम्यान, ज्योती आणि दानिश दिल्लीच्या पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये अनेकदा भेटले होते. याशिवाय त्यांनी व्हाट्सअॅप, टेलीग्रॅम आणि स्नॅपचॅटसारख्या अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेरांसोबत संपर्क साधला होता आणि संवेदनशील माहिती दिली होती.
हे ही वाचा >> गजानन मारणे गँगची हवाबाजी बंद! पुणे पोलिसांचा मोठा दणका, 'त्या' 15 लक्झरी गाड्या...
ADVERTISEMENT
