BMC कडून थेट मिथुन चक्रवर्तींना नोटीस, 'ते' अवैध बांधकाम पाडणार? नेमकं प्रकरण काय?

महापालिकेने केलेल्या तपासणीदरम्यान  एरंगल गावातील हीरा देवी मंदिराजवळ दोन मेझानाइन मजल्यांच्या इमारती, एक ग्राउंड फ्लोअर आणि विटा, लाकूड, काच आणि एसी शीटपासून बनवलेली तीन बांधकामं आढळली.

Mumbai Tak

मुंबई तक

18 May 2025 (अपडेटेड: 18 May 2025, 12:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मिथून चक्रवर्ती त्या बंगल्यामुळे अडचणीत?

point

BMC ची नोेटीस, 'ते' बांधकाम पाडणार?

BMC Notice to Mithun Chakraborty : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC)ने मड भागातील अवैध बांधकामांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचंही नाव समोर आलंय. मलाड येथील एरंगल गावात त्यांच्या मालकीच्या भूखंडावर कथित अवैध बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

हे वाचलं का?

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना 10 मे पासून एका आठवड्याच्या आत या बांधकामाबद्दलची माहिती द्यावी लागेल, अन्यथा ते पाडलं जाईल. यासोबतच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवारही आहे. बीएमसीने मड परिसरात 100 हून अधिक अवैध बांधकामं शोधली असून, यामध्ये काही बंगल्यांचाही समावेश आहे. बनावट लेआउट प्लॅनच्या आधारे हे बंगले बांधले गेले आहेत. मे अखेरीस ही सर्व बांधकामं हटवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. 

हे ही वाचा >> Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर

महापालिकेने केलेल्या तपासणीदरम्यान  एरंगल गावातील हीरा देवी मंदिराजवळ दोन मेझानाइन मजल्यांच्या इमारती, एक ग्राउंड फ्लोअर आणि विटा, लाकूड, काच आणि एसी शीटपासून बनवलेली तीन तात्पुरती बांधकामं आढळली. ही सर्व बांधकामं परवानगीशिवाय केली गेली आहेत. याप्रकरणी मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 351 (1A) अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना बांधकाम का पाडू नये, त्यात बदल का करू नये किंवा जागेचा वापर का थांबवू नये, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.

हे ही वाचा >> पवार, ठाकरे, राऊतांसमोर तुफान फटकेबाजी, 'नरकातला स्वर्ग' प्रकाशित करणारे शरद तांदळे कोण?

वेळेत उत्तर न दिल्यास नगरपालिका संरचना पाडण्याची कारवाई करू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, असं उल्लंघन मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 475A अंतर्गत येतात. त्यामुळे दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांनी नोटीशीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "मी कोणतंही अवैध बांधकाम केलेलं नाही आणि माझ्याकडे कोणतीही अनधिकृत संरचना नाही. अनेकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, आम्ही आमचं उत्तर पाठवणार आहोत."


 

    follow whatsapp