नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. याबाबत क्रिकेटप्रेमींकडून उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेट आणि इतर क्रीडा प्रकारांच्या वाढत्या व्यावसायिकीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि.7) थेट भाष्य करत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट म्हटलं की, आता क्रिकेट आणि इतर खेळांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप न करण्याची वेळ आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : चक्क वकिलानेच सरन्यायाधीशांवर केला हल्ल्याचं प्रयत्न, भूषण गवई फक्त 'एवढंच' म्हणाले अन्...
'क्रिकेटमध्ये खेळासारखं काही उरलेलं नाही", सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
जबलपूर विभागातील एका क्रिकेट संघटनेशी संबंधित याचिकेवर सुनावणीदरम्यान खंडपीठाने म्हटलं, “आता क्रिकेटमध्ये खेळासारखं काही उरलेलं नाही. हा निव्वळ व्यवसाय झाला आहे.” सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नाथ यांनी उपस्थित वकिलांना हलक्याफुलक्या शब्दांत विचारलं, “आज आपण क्रिकेट खेळतोय. चार प्रकरणं आहेत. एका प्रकरणाची सुनावणी आधीच दुसऱ्या फेरीसाठी तहकूब करण्यात आली आहे. हे दुसरे प्रकरण आहे. आणखी दोन प्रकरणे आहेत. म्हणजे आज किती टेस्ट मॅच खेळणार आहात?”
हेही वाचा : Personal Finance: तुम्हीही टर्म इन्शुरन्स खरेदी करताना 'या' 4 चुका करता? वेळीच व्हा सावध नाहीतर..
क्रीडा क्षेत्रातील प्रकरणांवर हस्तक्षेप करणे थांबवायला हवं - सर्वोच्च्च न्यायालय
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी क्रिकेटबद्दल देशातील लोकांमध्ये किती वेड आहे, याबाबत भावना व्यक्त केली असता न्यायमूर्ती नाथ म्हणाले, “आता या न्यायालयाने क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉलसारख्या खेळांच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणं थांबवायला हवं.”
क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रकरणांमागे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत
वकिलांनी सांगितलं की काही अडचणींमुळे अशी प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात येतात. त्यावर न्यायमूर्ती नाथ म्हणाले, “या सर्व प्रकरणांमागे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. कोणत्याही खेळाचं व्यावसायिकीकरण झालं की असे प्रश्न निर्माण होणं अपरिहार्य ठरतं.” सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी देशातील क्रीडा व्यवस्थापन, व्यावसायिक दबाव आणि न्यायालयीन हस्तक्षेपाच्या मर्यादांवर नवी चर्चा सुरू करणारी ठरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
संतोष देशमुखांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे बॅनर झळकवून पैसे मागणारा आहे तरी कोण?
ADVERTISEMENT
