नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, दृश्य पाहून अंगावर काटा

Nandurbar Accident : राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी घाटात रविवारी बसचा भीषण अपघात झाला. दिवाळीच्या सुट्टीनंतर लहान विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी एक स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळल्याची मन सुन्न करून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे.

Nandurbar Accident

Nandurbar Accident

मुंबई तक

09 Nov 2025 (अपडेटेड: 09 Nov 2025, 07:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चालकाचे वाहन चालवत असताना नियंत्रण सुटले आणि बसच दरीत...

point

युद्धपातळीवर बचावकार्य सुरु...

point

नंदुरबार जिल्ह्यात बसचा मोठा अपघात

Nandurbar Accident : राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी घाटात रविवारी बसचा भीषण अपघात झाला. दिवाळीच्या सुट्टीनंतर लहान विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी एक स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळल्याची मन सुन्न करून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालन्यात 24 वर्षीय तरुणाचे 38 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध, दोघांनीही गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, तपासातून भलतच...

चालकाचे वाहन चालवत असताना नियंत्रण सुटले आणि बसच दरीत...

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात अमली गाव-अमलवीबारी घाटात वळण घेणाऱ्या रस्त्यावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाचे वाहन चालवत असताना नियंत्रण सुटले आणि बसच दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला आणि विद्यार्थ्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. 

युद्धपातळीवर बचावकार्य सुरु...

स्थानिक प्रशासनाने तत्काळपणे घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केले आणि जखमींना अक्कलकोट आणि नंदुरबार येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर आले. 

हे ही वाचा : नांदेड हादरलं! 6 वर्षीय चिमुरडी शिकवणीहून घरी जाताना 22 वर्षीय नराधमाने केले लैंगिक अत्याचार, नागरिकांकडून फाशीची मागणी

अधिकाऱ्यांनी अद्यापही मृतांच्या आकड्याबाबत कोणतीही माहिती जारी केलेली नाही. पण, मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

    follow whatsapp