"सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

साध्वी ऋतंभरा यांनी प्रवचनात हल्लीच्या मुलींविषयी वक्तव्य करत म्हटलं, "सध्या मुली नग्न होऊन आणि अश्लील नृत्य करून चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत आहेत."

साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

मुंबई तक

• 11:54 AM • 02 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

साध्वी ऋतंभरांचं मुलींविषयी वादग्रस्त विधान

point

"मुली नग्न होऊन पैसे कमवतात..." ते विधान अन् पुन्हा वाद

Viral News: सध्याच्या काळात, धार्मिक नेत्यांचं वादग्रस्त विधान मुली आणि महिलांवर ऐकायला किंवा पाहायला मिळतं. यापूर्वी कथाकार अनिरुद्धाचार्य आणि प्रेमानंद जी महाराज यांनी अशा प्रकारची वादग्रस्त विधाने केली होती. आता या यादीत साध्वी ऋतंभरा यांचे नाव जोडले गेल्याचं समोर आलं आहे. साध्वी ऋतंभरा यांनी हल्लीच्या मुलींविषयी वक्तव्य करत म्हटलं, "सध्या मुली नग्न होऊन आणि अश्लील नृत्य करून चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत आहेत."

हे वाचलं का?

चुकीच्या पद्धतीने पैसे कमवतात...

प्रवचनात त्यांनी असंही म्हटलं की, "हिंदू मुलींना पाहून मला लाज वाटते. काही मुली घाणेरडी गाणी गाऊन आणि त्या गाण्यांवर अश्लील पद्धतीने नाच करुन पैसे कमवत आहेत. घरात मुली पैसा आणून देत असल्याने त्या अशा पद्धतीने पैसे कमवत असल्या तरी त्यांचे पती किंवा वडील त्यांना काहीच म्हणत नाहीत. मात्र, असं केल्याने घरात वाईट पैसा येतो आणि पूर्वजांचे आत्मे तडफडू लागतात."

कमीत कमी कपडे घालून रील्स...

साध्वी ऋतंभरा यांनी प्रवचनात आजकालच्या रील्सच्या ट्रेंडवर आक्षेप दर्शवला आणि प्रसिद्धीसाठी रील्स बनवणाऱ्या मुली आणि महिलांवर त्यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, "प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुली अश्लील पद्धतीने नाचून, घाणेरडी गाणी गात आणि कमीत कमी कपडे घालून रील बनवत आहेत." साध्वी यांनी महिलांना सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा: सासूने दिलं नशेचं औषध अन् बेशुद्ध झाल्यानंतर दीरांकडून घाणेरडं कृत्य... महिलेनं सासरच्यांबद्दल सगळंच सांगितलं

मुलींच्या चारित्र्यावर प्रश्न 

साध्वी ऋतंभरा यांच्या विधानापूर्वी अनिरुद्धाचार्य आणि प्रेमानंद जी महाराजांनी देखील हल्लीच्या मुलींबद्दल आपले विधान दिलं होतं. दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिप चुकीचं असल्याचं सांगत मुलींच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मते, आजकाल मुली लग्नापूर्वी संबंध ठेवतात, ज्यामुळे त्यांचं चरित्र शुद्ध राहत नाही. तसेच, ज्या मुलींचे लग्नापूर्वी संबंध असतात त्या त्यांच्या पतीशी किंवा सासरच्या लोकांशी कशी प्रामाणिक राहू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा: Personal Finance: SIP सुरू करा, पण गणित समजलं नाही तर विषय होईल हार्ड!

अशातच, कथाकार अनिरुद्धाचार्य यांनी काही दिवसांपूर्वी आजकालच्या मुलींबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं होतं. मुलींनी 25 वर्षे पूर्ण होण्याआधी लग्न केलं पाहिजे. हल्लीच्या मुलींचे लग्न होण्याआधी त्यांना 4-5 बॉयफ्रेंड्स असतात आणि याचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. सोशल मीडिया आणि आजची जीवनशैली मुलींच्या आयुष्यात अस्थिरता आणत असून पालकांनी त्यांच्या मुलींचे लग्न वेळेत लावणं योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. 

    follow whatsapp