धक्कादायक... दीर करायचे वहिनीवर बलात्कार, सासूने करायची मदत आणि नवरा राहायचा पाहत!
मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात पीडितेने आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. सासरच्या लोकांकडून तिचा 9 वर्षांपासून शारीरिक छळ केला जात असून त्यामध्ये महिलेची सासू आणि तिच्या दीरांचा समावेश होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीडितेचा सासरमध्ये शारीरिक छळ
सासू नशेची औषधं द्यायची आणि दीरांकडून घाणेरडं कृत्य...
सासरच्या मंडळींविरोधात महिलेनं केली तक्रार
Crime News: मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पीडितेने आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या मते, सासरच्या लोकांकडून तिचा 9 वर्षांपासून शारीरिक छळ केला जात होता. यामध्ये महिलेची सासू आणि तिच्या दीरांचा समावेश होता. इतकेच नव्हे, या सगळ्या प्रकाराबद्दल नवऱ्याला माहीत असून देखील तो फक्त तिच्यावर होणारा अत्याचार बघत बसल्याचा पीडितेने आरोप केला आहे.
लग्नाच्या काही महिन्यांतच शारीरिक शोषण
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिची सासू तिला नेहमी नशेची औषधं द्यायची. औषधांमुळे तिला गुंगी यायची आणि त्यावेळी बेशुद्ध झाल्यानंतर महिलेचा दीर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. लग्नाच्या काही महिन्यांतच तिचं शारीरिक शोषण सुरु झाल्याचं पीडितेनं सांगितलं.
सतत धमक्या दिल्या जात होत्या
तसेच, महिलेसोबत होणाऱ्या या घाणेरड्या कृत्याबद्दल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला माहित असूनही तिची कोणीच मदत केली नसल्याचं पीडितेनं सांगितलं. याउलट, तिने या सगळ्याला विरोध केला असता कुटुंबातील लोकांकडून तिला सतत धमक्या दिल्या जात असल्याचा पीडितेने दावा केला.
पतीला माहित असून देखील गप्प...
इतकेच नव्हे तर आपल्या पत्नीसोबत असं घाणेरडं कृत्य होत असल्याचा पाहून महिलेच्या पतीने काहीच केलं नाही. याबद्दल माहिती असून देखील तो गप्पच राहिला. खरं तर, तो तिला आर्थिक मदतही करत नव्हता. नवरा बाहेर कामाला असून सुद्धा पीडितेच्या तिच्या खर्चासाठी पैसे दिले जात नव्हते.










