लोणावळ्यात तरुणांनी भुशी डॅमचं कुंपण ओलांडलं, धपा धप मारल्या उड्या अन् नंतर गटांगळ्या खात...

मुंबई तक

09 Jun 2025 (अपडेटेड: 09 Jun 2025, 06:49 PM)

Bhushi Dam : लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या भुशी डॅममध्ये दोन तरुणांचा पोहताना मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेनं लोणावळ्यात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. ही घटना 8 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

two tourists drown in bhushi dam in lonavala

two tourists drown in bhushi dam in lonavala

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या भुशी डॅममध्ये दोन तरुणांचा मृत्यू

point

बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची मोठी अपडेट समोर

Bhushi Dam : लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या भुशी डॅममध्ये दोन तरुणांचा पोहताना दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं लोणावळ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना 8 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्ती हे उत्तर प्रदेशचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांचे मृतदेह शिवदुर्ग या रेस्क्यू पथकाने बाहेर काढल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सावत्र वडिलांनी अल्पवयीन मुलीला ठेवलं बंद दाराआड, नंतर कुंटणखाण्यात...

नेमकं काय घडलं?

जमाल आणि साहिल अश्रफली शेख अशी धरणात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. ते पिंपरी-चिंचवड येथे रोजगारासाठी आले होते. दरम्यान, लोणावळ्यात फिरायला आल्याने त्यांना भुशी डॅममध्ये पोहण्याचा मोह आवरला नाही. अशावेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. भुशी डॅमच्या मागील बाजूस लोखंडी कुंपण आहे. पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्याच्या हेतूनेच हे लोखंडी कुंपण घातले गेले. मात्र, ह्या कुंपणाचा काही भाग तुटल्याने दोन तरुणांनी पाण्यात उडी घेतली आणि त्यांचा बडून मृत्यू झाला आहे. 

घटनास्थळी इतरही काही पर्यटक बघ्याच्या भूमिकेत होते. यातील एक तरुण हा उत्तर प्रदेशातील तुलापूर येथील आहे. तर दुसरा तरुण हा पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौकातील आहे. हे दोघेही लोणावळ्यात फिरायला आले असताना ही घटना आहे. 

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्यात अनेक पर्यटक निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र, पर्यटक कोणतीही काळजी न घेता बेधुंद होतात आणि नंतर जीवाला मुकतात. याआधीही भुशी डॅममध्ये अनेक पर्यंटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. 

हेही वाचा : मुंबईत धावत्या लोकलमधून प्रवासी पडले, 5 जण दगावल्याची माहिती, रेल्वेत काय घडलं?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती

याचप्रकरणात आता वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास जगताप यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, प्रतिबंधक घालण्यात आलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. भुशी डॅमच्या आजूबाजूला असणारे लोखंडी तारेचे कुंपण घालण्यात आले होते. ते कोणीही ओलांडू नये, हे पर्यटकांच्याच फायद्याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.