'गरोदर राहायचं होतं', मुंबईच्या नीतूने छांगुर बाबाची घेतली मदत अन् नवऱ्यासोबत मिळून... तरुणीची ही कहाणी सर्वांनाच चक्रावून टाकेल!

उत्तर प्रदेशातील छांगुर बाबा हा नवीन वोहरा और नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. दरम्यान, मुंबईची नीतू वोहरा देखील चर्चेत आली आहे. नीतूसोबत नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

'गरोदर राहायचं होतं', मुंबईच्या नीतूने छांगुर बाबाची घेतली मदत अन्

'गरोदर राहायचं होतं', मुंबईच्या नीतूने छांगुर बाबाची घेतली मदत अन्

मुंबई तक

10 Jul 2025 (अपडेटेड: 10 Jul 2025, 11:25 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गरोदर होण्यासाठी मुंबईची तरुणी आली छांगुर बाबाच्या संपर्कात

point

मुंबईच्या नीतूने छांगुर बाबासोबत मिळून केलं भलतंच!

Mumbai Crime: छांगुर बाबाच्या धर्मांतरच्या रॅकेटने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला होता. छांगुर बाबा हा नवीन वोहरा और नीतू वोहरासोबत मिळून हे रॅकेट चालवत होता. सध्या, छांगुर बाबा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, मुंबईची नीतू वोहरा देखील चर्चेत आली आहे. खरंतर नीतू आणि नवीन हे पती-पत्नी आहेत. पण दोघेही छांगुर बाबाच्या संपर्कात आले आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. नंतर तिघांनीही हिंदू मुलींना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

कोण आहे नीतू वोहरा उर्फ नसरीन?

मिळालेल्या माहितीनुसार, नीतू नवीन वोहरा ही तामिळनाडूची रहिवासी आहे. नीतूचं लग्न नवीन वोहराशी झालं होतं. मात्र, लग्नानंतर तिला मुलं झाली नाहीत. तिला गरोदरपणात काही अडचणी येत होत्या. या काळात नवीन बलरामपूरच्या छांगुर बाबाच्या संपर्कात आला. 

छांगुर बाबाशी संपर्क वाढत गेला...

नीतू आणि नवीन मुंबईहून बलरामपूरला बाबाला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी गरोदरपणात अडचणी आणि काही मानसिक त्रास होत असल्याचं नितूने बाबाला सांगितलं. हे ऐकून छांगुर बाबाने तिला काही औषधे दिली आणि त्याची एक अंगठी सुद्धा दिली. त्यानंतर  नवीन आणि नितू मुंबईहून बऱ्याच वेळा बलरामपूरला आले आणि बाबाला भेटू लागले.

हे ही वाचा: "समलिंगी संबंधाचे अश्लील व्हिडीओ..." मुंबईतील CA ला धमकी अन् उचललं टोकाचं पाऊल!

छांगुर बाबाने नीतू वोहरा आणि तिचा पती नवीन वोहरा यांचे धर्मांतर केले. धर्मांतर केल्यानंतर नीतू वोहरा यांचे नाव नसरीन आणि नवीन वोहरा यांचे नाव जमालुद्दीन असे ठेवण्यात आले.

धर्मांतराचं रॅकेट चालवण्यात सहभागी

पती-पत्नी दोघेही बाबासोबत वेळ घालवू लागले. छांगुर बाबा नसरीनसोबत राहू लागला. मग तिघांनीही एकत्र येऊन हे धर्मांतर रॅकेट वाढवले. छांगुर बाबा नसरीनला पत्नी म्हणून वागणूक देत होता. आता ते तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी आरोपी बाबाच्या मुलालाही अटक केली आहे.

हे ही वाचा: Pune Crime : शरीरसंबंधांना चटावला तरुण, लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी शरीरसंबंध, तरुणी गर्भवती राहताच बाळ...

इस्लाम धर्म स्वीकारल्यास लाखो रुपये...

पोलिसांच्या तपासात हे तिघेही गरीब आणि कामगार वर्गातील मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना फसवून इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडत असल्याचं समोर आलं. हिंदू प्रवर्गातील मुलींना इस्लाम धर्म स्वीकारल्यास लाखो रुपये दिले जात होते. तसेच, ओबीसी (OBC) प्रवर्गातील मुलींना 10 ते 12 लाख रुपये, सामान्य जातीतील मुलींना (म्हणजेच शीख, ब्राह्मण, क्षत्रिय) 15 लाख रुपये आणि इतर जातीतील मुलींना 8 लाख रुपये देण्यात येत होते.

    follow whatsapp