CBSE Board Result Date: CBSE 10वी, 12वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट, तारखेबाबत नेमकं काय म्हणाले बोर्डाचे अधिकारी?

काही मीडिया रिपोर्ट्सकडून, CBSE बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, CBSE बोर्डाचे उपसचिव नीति शंकर शर्मा यांनी निकाल आज घोषित होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

CBSE चा निकाल नेमका कधी?

CBSE चा निकाल नेमका कधी?

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 03:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

CBSE चा निकाल नेमका कधी?

point

CBSE 10 वीचा निकाल कधी जाहीर होणार?

point

उपसचिवांनी दिली महत्त्वाची अपडेट

CBSE 10th Result Date: CBSE बोर्डाच्या 10 वीचे विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत. बोर्डाकडून निकालाच्या तारखेची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सकडून, CBSE बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, CBSE बोर्डाचे उपसचिव नीति शंकर शर्मा यांनी निकाल आज घोषित होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

CBSE बोर्डाच्या निकालासंबंधी उपसचिव नीति शंकर शर्मा यांनी सांगितले की सध्या निकाल जाहीर होण्याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे निकाल नेमक्या कोणत्या तारखेला लागणार हे स्पष्ट सांगता येत नाही. ज्यावेळी निकालाची तारीख जाहीर होईल त्यावेळी ती माहिती सगळीकडे सांगण्यात येईल. 

हे ही वाचा: मोठी बातमी! विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला राम राम, BCCI चे प्रयत्न निष्फळ

कुठे आणि कसा कराल निकाल चेक?

1. निकाल जाहीर झाल्यानंतर CBSE च्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in या cbse.gov.in वर जा. 
2. होम पेजवर 'CBSE 10th Result Direct Link' वर क्लिक करा.
3. लॉगिन पेज उघडल्यानंतर तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
4. तुमचा निकाल लवकरच स्क्रिनवर दिसेल.
5. विद्यार्थी याची डिजीटल कॉपी डाउनलोड करून स्वत:कडे ठेवू शकतात. 

हे ही वाचा: Maharashtra SSC Board Result 2025: मोठी बातमी, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, 'या' दिवशी पाहता येईल निकाल

'या' अॅपद्वारे तपासू शकता निकाल

दरवर्षी, CBSE बोर्ड डिजीलॉकर वेबसाइट किंवा अॅप आणि UMANG अॅपद्वारे निकाल तपासण्याचा पर्याय देखील देते. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी DigiLocker च्या अधिकृत वेबसाइट cbseservices.digilocker.gov.in किंवा अॅपला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतील.

    follow whatsapp