Extra Marital Affaire Viral News : हरियाणाच्या पानीपतमध्ये एक खळबळजनक घटना घडली असून व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पत्नी तिच्या पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं. सोनाली टोल प्लाझा येथे ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. एका महिलेनं तिच्या कुटुंबियांसह पतीला गर्लफेंडसोबत पकडलं. कारमधून गर्लफ्रेंडसोबत प्रवास करत असताना पत्नीने पतीला घेरलं आणि एकच राडा केला.
ADVERTISEMENT
टोल प्लाझावर नेमकं काय घडलं?
महिलेला खबर मिळाली होती की, तिचा पती हरिद्वारहून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत प्रवास करत आहे. अशातच या महिलेनं तिचे भाऊ आणि कुटुंबियांसोबत टोल पाल्झावर कार थांबवली आणि पतीला रंगेहाथ पकडलं. कारच्या पुढच्या सीटवर बसलेल्या तरुणीला पाहून महिला प्रचंड संतापली.
हे ही वाचा >> टोल कर्मचाऱ्याला चिरडून ट्रक चालक पळाला... विसापूर टोल नाक्यावरचा धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ
भीतीपोटी तरुणीनं पळ काढला अन् महिलेनं बनवला व्हिडीओ
कारमध्ये पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडल्यानंतर महिलेनं मोठा राडा केला. त्यानंतर तरुणीनं कारमधून उतरून भर रस्त्यावरून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार या महिलेनं कॅमेरात कैद केला. महिलेनं माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, 10 वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. दोघांनाही 7 वर्षांचा मुलगा आहे, असं या महिलेनं दावा केला आहे. सात वर्षांपासून पतीचा अन्य महिलेशी अफेअर सुरु होता, असंही या महिलेनं सांगितलं. महिलेनं तिच्या पतीला याआधी कुरुक्षेत्र इथे रंगेहाथ पकडलं होतं.
विरोध केला तर जीवे मारण्याची धमकी
तिने पतीला विरोध केल्यावर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पतीने कारने उडवण्याचाही प्रयत्न केल्याचं महिलेनं म्हटलं आहे. या गंभीर प्रकरणी तक्रार दाखल करणार आहे. तिच्या जीवाला धोका निर्माण झाला तर, या परिस्थितीला तिचा पती सोनू सहगल, त्याची गर्लफ्रेंड आणि कुटुंबीय जबाबदार असतील, असंही या महिलेनं म्हटलंय. रिपोर्टनुसार, तरुणी कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहे. ही तरुणी विवाहित आहे. तिला दोन मुलं आहेत. ही तरुणी तिच्या मुलांना सोडून अन्य पुरुषासोबत बाहेर फिरते, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.
हे ही वाचा >> मिठी नदी सफाई घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरियाला समन्स, प्रकरण काय? अभिनेता कसा अडकला?
ADVERTISEMENT
