पत्नीने प्रियकरासोबत केला अश्लील डान्स! नवऱ्याला Video पाठवला...नंतर घडली सर्वात भयंकर घटना!

मुंबई तक

24 Jun 2025 (अपडेटेड: 24 Jun 2025, 07:45 PM)

Husband And Wife Shocking Viral News : हरियाणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागून जीवन संपवलं आहे.

Husband-Wife Shocking Viral News

Husband-Wife Shocking Viral News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

 पतीने आयुष्य संपवण्यापूर्वी बनवला व्हिडीओ 

point

प्रियकराच्या प्रमोशनसाठी मागितले पाच लाख

point

टीकटॉकवर ओळख झाली, नंतर केलं लग्न आणि...

Husband And Wife Shocking Viral News : हरियाणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागून जीवन संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूपूर्वी पतीने व्हिडीओ बनवून दोघांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ही घटना हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील डोभ गावात घडली आहे. मगन असं मृताचं नाव आहे. मगन एका अॅपसाठी डिलिव्हरीचं काम करायचं. मगनच्या पत्नीचं नाव दिव्या असून तिच्या प्रियकराचं नाव दीपक आहे.

हे वाचलं का?

 पतीने आयुष्य संपवण्यापूर्वी बनवला व्हिडीओ 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मगनने जीवन संपवण्यापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले. हा व्हिडीओ त्याने त्याच्या बहिणीला पाठवला आणि शेतात जाऊन एका झाडाला गळफास लावून आयुष्य संपवलं. व्हिडीओत मगनने सांगितलं की, पत्नी दिव्याचं दीपक नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मगनची पत्नी महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये काम करायची. त्याचदरम्यान दीपकसोबत तिची जवळीक वाढली आणि दोघांमध्ये अफेअर सुरु झालं. दोघांचाही अश्लील डान्सचा व्हिडीओही समोर आला.

हे ही वाचा >> पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...

प्रियकराच्या प्रमोशनसाठी मागितले पाच लाख

मगनने व्हिडीओत आरोप केला आहे की, दीव्याने दीपकच्या प्रमोशनसाठी पाच लाख रुपये देण्यासाठी दबाव टाकला होता. तिने ही रक्कम वसूल केली होती. दीव्याने तिच्या पतीला वडिलांची हत्या करून संपत्ती विकण्यासाठी सांगितलं होतं. मगनने व्हिडीओत म्हटलं की, तो त्याच्या वडिलांची हत्या करू शकत नाही. त्यामुळे त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. हे ऐकताच कुटुंबियांनाही धक्का बसला.

हे ही वाचा >> खासदार आणि भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर तरूणीचे लैंगिक शोषणाचे आरोप, म्हणाली आता मी...

टीकटॉकवर ओळख झाली, नंतर केलं लग्न

मगन आणि दीव्याची ओळख टीकटॉकवर झाली होती. दोघांनीही 2019 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. मगन झोमॅटोमध्ये डिलिव्हरीचं काम करायचा. दरम्यान, कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दीपक विरोधात गुन्हा दाखल केला. दोघांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं पोलिसांनी म्हटलंय.