आधी चोर म्हणून मारहाण अन् दुसऱ्या दिवशी त्यालाच बनवलं जावई... एका रात्रीत नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील जौनपुरमध्ये मध्यरात्री एका तरुणाला चोर समजून मारहाण करण्यात आली आणि नंतर दुसऱ्याच दिवशी घरातल्या कुटुंबियांनी त्याला जावई बनवलं. नेमकं काय घडलं?

आधी चोर म्हणून मारहाण अन् दुसऱ्या दिवशी त्यालाच बनवलं जावई...

आधी चोर म्हणून मारहाण अन् दुसऱ्या दिवशी त्यालाच बनवलं जावई...(फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

10 Jul 2025 (अपडेटेड: 10 Jul 2025, 12:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रात्री चोर समजून केली मारहाण अन् दुसऱ्या दिवशी बनवलं जावई

point

एका रात्रीत नेमकं काय घडलं?

UP News: उत्तर प्रदेशातील जौनपुरमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वच चकित झाले. मध्यरात्री एक तरुण लपुन छपून एका घरात घुसला. त्यावेळी घराचे लाइट्स लागले आणि घरातील लोक जागे झाले. त्या तरुणाला पाहताच सर्व जण "चोर...चोर" असं ओरडू लागले. त्यावेळी घरातील कुटुंबियांकडून त्या तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. तो तरुण सारखं म्हणत होता, "प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या...". त्यानंतर कुटुंबियांनी तरुणाची गोष्ट ऐकली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. घरच्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला जावईच बनवून टाकलं. परिसरात या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

खरंतर, तो तरुण ज्या घरात शिरला होता त्या घरात त्याची प्रेयसी राहत होती. तो मध्यरात्री त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. पण त्यावेळी प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याला पाहिलं आणि चोर समजून बेदम मारहाण केली. त्यानंतर, तरुणाने सगळं सत्य सांगितलं असता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या मुलीचं त्या तरुणासोबत लग्न लावून दिलं. 

हे ही वाचा: 'गरोदर राहायचं होतं', मुंबईच्या नीतूने घेतली छांगुर बाबाची मदत अन् नवऱ्यासोबत मिळून... तरुणीची ही कहाणी सर्वांनाच चक्रावून टाकेल!

चोर समजून बेदम मारहाण...

मिळालेल्या माहितीनुसार, जसरापाटन पोलीस स्टेशन परिसरातील करीमपूर खुर्द गावात ही चकित करणारी घटना घडली आहे. खुठान पोलीस स्टेशन परिसरातील पनौली गावातील रहिवासी विकास पासवान हा सोमवारी रात्री त्याची प्रेयसी रुबीला भेटण्यासाठी लपुन छपून तिच्या घरी घुसला. त्यावेळी रात्रीच्या अंधारात कोणीतरी विकासला घरात शिरताना पाहिले. त्याला चोर समजून घरातील सदस्य ओरडू लागले. घरातील कुटुंबीय जागे झाल्यानंतर त्यांनी विकासला पकडलं आणि त्याला मारहाण केली. 

हे ही वाचा: 'त्या' एका गैरसमजामुळे भाच्याला मावशीच्या भांगेत सिंदूर लावायला भाग पाडले, नंतर केली बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल

परिसरात सर्वत्र या लग्नाची चर्चा

घरातील सदस्यांनी तरुणाला पकडल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्या तरुणाने सगळं खरं सांगितलं. आपण चोर नसून प्रेयसीला भेटायला आल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं आणि त्यावेळी त्याने आपल्या प्रेयसीचं नाव रूबी असल्याचं देखील सांगितलं. त्यानंतर, रुबीला सुद्धा त्या दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल विचारण्यात आले. रूबीच्या म्हणण्यावरून दोघे खरंच प्रेमसंबंधात असल्याचं कुटुंबियांना कळालं. रुबीने यावर सहमती दर्शवली आणि ती विकाससोबत एकत्र राहू इच्छित असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. आता या लग्नाची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.


 

    follow whatsapp