Crime News: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून 11 वीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे दिल्लीच्या वजीराबाद परिसरातील असल्याची माहिती आहे. शुक्रवारी आरोपी तरुण पीडितेला ब्लॅकमेल करत तिला आपल्यासोबत एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. पण, ज्या कॅबमधून आरोपी पीडितेला घेऊन गेला, त्या कॅब चालकाला तरुणावर संशय आला आणि त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी तरुणाने पीडितेसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली आणि नंतर, तिला वजीदाबादमधील आपल्या मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
इंस्टाग्रामवर तरुणाशी ओळख झाली अन्...
दोन महिन्यांपूर्वी पीडित तरणीची इंस्टाग्रामवर एका साबिर नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर, दोघांमध्ये सतत बोलणं होऊ लागलं आणि कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली. त्यावेळी, साबिरने पीडितेला तो एका मोठ्या कंपनीत कार्यरत असल्याचं सांगितलं. काही दिवसांनंतर, 1 नोव्हेंबर रोजी आरोपीने तिला वजीदाबाद येथील आपल्या मित्राच्या फ्लॅटवर बोलवलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता ‘या’ मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर… नव्या फ्लायओव्हरमुळे वाहतूक कोंडीपासून प्रवाशांना दिलासा
अश्लील फोटो आणि व्हिडीओ ब्लॅकमेल करण्याची धमकी
मित्राच्या घरी गेल्यानंतर, आरोपीने पीडितेला जावे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. इतकेच नव्हे तर, आरोपी साबिरने त्याच्या मोबाईलमध्ये तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सुद्धा काढले. ते अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्याने पुन्हा त्या तरुणीला काश्मीरी गेट परिसरात पुन्हा भेटण्यासाठी बोलवलं.
हे ही वाचा: लिव्ह-इन-पार्टनरसोबत मैत्री करून देण्यासाठी बॉसचा दबाव! दोघांनी मिळून हत्येचा रचला कट अन् अखेर...
कॅब चालकाला संशय आला अन्...
त्यावेळी, आरोपी तरुणीला कॅबमध्ये बसवून कमला नगर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. यादरम्यान, कॅब चालकाला तरुणावर संशय आला. त्यानंतर, त्या चालकाने दोघांना हॉटेलजवळ सोडलं आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने पोलिसांना सगळ्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर, पोलीस तातडीने हॉटेलमध्ये पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून पीडितेची सुटका केली आणि तिच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली.
ADVERTISEMENT











