Devorce News : संसार टिकवण्यासाठी नवरा आणि बायको यांच्या भावना एकमेकांशी जोडल्या जाणं गरजेचं असतं. पण, हल्ली याच नात्यातील संसार सुरु होण्याआधीच ब्रेक लागतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. एका नवविवाहितेनं आपल्या पतीवर शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली. वधूच्या वडिलांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण समोर आलं. दोन्ही कुटुंबात मोठा तणाव निर्माण झाल्याचे चित्र समोर आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे भविष्य
लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने...
बेलीपार येथे एका बी.टेक. पदवीधर उच्चशिक्षित तरुणाशी मुलीचा विवाह झाला होता, तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने पतीवर शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचा आरोप करत थेट घटस्फोटाची मागणी केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते.
या संबंधित प्रकरणावर तब्बल दोन दिवस चर्चा सुरु होती. मात्र, दोन्ही बाजूंमध्ये असा कोणताही तोडगा काढण्यात आला नव्हता. सहजनवा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दोन्ही कुटुंबांच्या बाजू ऐकून दोन्ही गटांना देखील शांत राहण्यास पोलिसांनी सांगितलं होतं.
दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर नवऱ्याचं मेडीकल चेकअप...
दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर नवऱ्याचं मेडीकल चेकअप करण्यात आले होते. तेव्हा समोर आलेल्या वैद्यकीय अहवालानंतर, वधू घटस्फोटाच्या मागणीवर ते ठाम आहेत आणि यातून माघार घेण्यास ते तयार नव्हते. सहजनवा पोलिसांनी नवरा मुलाच्या मेडीकल चेकअपसाठी पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
हे ही वाचा : पुण्यात भीषण अपघात, ई-बसने गर्भवती महिलेला दिली धडक, तर 9 वर्षीय सख्ख्या बहिणीचा दुर्दैवी अंत
सहजनवा पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश चौबे यांनी सांगितलं की, "बेलीपार येथील एका व्यक्तीने मुलीच्या पतीची शारीरिकदृष्ट्या अक्षम परिस्थिती असल्याची तक्रार दाखल केली होती, या प्रकरणात पोलीस कायदेशीर कारवाई करतील," या विचित्र प्रकरणाची परिसरात चांगली चर्चा रंगल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT











