काय होता राजा-सोनमचा हनिमून प्लॅन? सोनमच्या सासूनं केला धक्कादायक खुलासा, "शिलाँगचं तिकीट.."

Raja And Sonam Latest News Update : मध्यप्रदेशच्या इंदौरमधील राजा-सोनमच्या हनिमून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मेघालयमध्ये राजाच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी सोनम रघुवंशीला पोलिसांनी अटक केली आहे.

Raja And Sonam Honeymoon Case Update

Raja And Sonam Honeymoon Case Update

मुंबई तक

09 Jun 2025 (अपडेटेड: 09 Jun 2025, 09:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजा आणि सोनम हनिमून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

point

राजाच्या आईने माध्यमांशी बोलताना केला मोठा खुलासा

point

सोनमची सासू राजा-सोनमच्या हनिमून प्लॅनिंगबाबत काय म्हणाली?

Raja And Sonam Latest News Update : मध्यप्रदेशच्या इंदौरमधील राजा-सोनमच्या हनिमून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मेघालयमध्ये राजाच्या हत्येच्या आरोपाखाली पत्नी सोनम रघुवंशीला पोलिसांनी अटक केली आहे. अशातच राजाच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे. हनिमूनसाठी शिलाँगची तिकीट सोनमनेच बुक केली होती, राजाचा फिरायला जाण्याचा प्लॅन नव्हता, असं त्याच्या आईने म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

लग्नानंतर हनिमूनचा प्लॅन केला आणि..

राजाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी सोनमच्या कुटुंबियांकडूनच जोर लावण्यात आला होता. दोन्ही कुटुंब लग्नाबाबत खुश होते. राजा आणि सोनमही लग्नानंतर आनंदात राहत होते. पण लग्नानंतर सोनमने शिलाँगसाठी हनिमूनची तिकीट बूक केली, तेव्हा राजाने त्याच्या आईला सांगितलं..मी आता फिरायला जाऊ शकत नाही.आताच लग्न झालं आहे. काही वेळानंतर जाईल. पण सोनमने तिकीट बुक केल्यानं राजाला जावं लागलं. आईने राजाला विचारलं होतं की, रिटर्न तिकीट बुक का केली नाही? यावर राजा म्हणाला होता. सर्व प्लॅनिंग सोनमने केलं आहे. इतर गोष्टी मला माहित नाहीत. 

हे ही वाचा >> राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? सोनमने घरच्या नोकराला पटवलं अन्...खळबळजनक माहिती समोर!

शॉपिंग आणि हनिमूनची तयारी

हनिमूनच्या एक दिवस आधी राजा शॉपिंगला गेला होता. तेव्हा त्याच्या आईने विचारलं होतं, लग्नात एवझे कपडे खरेदी केले,आता पुन्हा नवीन कपडे का घेतले? यावर राजा म्हणाला होता, सोनमने तिकीट बुक केलं आहे. आता जावच लागेल. राजाचं जर अपहरण झालं असेल, तर सोनमला काहीतरी लागलं असतं, पण तसं काही झालं नाही, असं राजाच्या आईने म्हटलं आहे.

मेघालयमध्ये राजाची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी सोनमचा शोध सुरु केला होता. रविवारी उशिरा रात्री गाजीपूराच्या काशी ढाब्याजवळ सोनमला पोलिसांनी अटक केली. ढाब्यावर काम करणाऱ्या साहिल यादवने म्हटलं की, सोनम रात्री एक वाजताच्या सुमारास ढाब्यावर आली  होती. त्यानंतर तिन भाऊ गोविंद रघुवंशीला फोन करण्यासाठी रडत रडत फोन मागितला. साहिलने तिला फोन दिला आणि पोलिसांना कळवलं.  त्यानंतर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं.

हे ही वाचा >> यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अडचणी वाढल्या! पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला भेटायची, नंतर केलं असं काही..

    follow whatsapp