नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत हॉस्टेलमध्ये घडलं नको तेच, आई-वडिलांचा आरोप कुणावर?

मुंबई तक

• 04:02 PM • 29 Aug 2026

अमेठीमधील नर्सिंग कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या वसतिगृहातील खोलीत छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या बातमीने कॉलेज परिसरात खळबळ उडाली. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला असून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सकाळी आईशी बोलली अन् काही तासांतच सगळं संपलं,

point

नर्सिंगच्या विद्यार्थिनीसोबत घडलं नको तेच

Crime News : नर्सिंग कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या दीप्ती यादव या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. दीप्ती तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीतील ही घटना आहे.

हे वाचलं का?

पंख्याला ओढणीच्या सहाय्याने...

28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त दीप्तीने सकाळीच तिच्या पालकांशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी तिच्या बोलण्यातून कोणत्याही प्रकारचा ताण किंवा अस्वस्थता जाणवली नव्हती. मात्र, काही तासांनंतर हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींना संशय आल्याने त्यांनी वॉर्डनला माहिती दिली. दरवाजा उघडला असता दीप्ती पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. हॉस्टेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

हे ही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप

हत्या करुन मृतदेह लटकवला

घटनेची माहिती मिळताच मुंशीगंज पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत आवश्यक पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, दीप्तीच्या पालकांनी या घटनेमागे हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

हे ही वाचा : MPSC पेपर लीक : सहा नेते, असंख्य फोटो..सुनील गाढवेचे कोणत्या नेत्यासोबत संबंध?

मुलीचा चेहराही पाहू दिला नाही

दीप्तीचे वडील कुंवर बख्श यादव आणि आई सुनीता यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. पालकांनी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, तसेच त्यांना मुलीचा चेहराही पाहू दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. दीप्ति आत्महत्या करूच शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे आत्महत्येची नोंद केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.