महागडा स्मार्टफोन घेण्यावरून आईसोबत वाद; 15 वर्षीय मुलीचं भयंकर पाऊल

मुंबई तक

• 08:33 AM • 29 Aug 2026

Crime News : विशाखापट्टणममध्ये महागडा स्मार्टफोन घेण्याच्या मागणीवरून आईसोबत झालेल्या वादानंतर 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महागडा स्मार्टफोन घेण्यावरून आईसोबत वाद

point

15 वर्षीय मुलीचं भयंकर पाऊल

Crime News : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे महागडा स्मार्टफोन घेण्याच्या मागणीवरून आईसोबत झालेल्या वादानंतर 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. आई-वडिलांमध्ये वैवाहिक मतभेद असल्याने दोघे वेगळे राहत होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : आधी बापाने केला बलात्कार, नंतर पुजाऱ्यानेही केलं लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

महागडा मोबाइल फोन घेणे परवडणारे नव्हते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संबंधित मुलगी महागडा आणि उच्च श्रेणीतील मोबाइल फोन घेण्यासाठी आईकडे सातत्याने मागणी करत होती. तिच्या मैत्रिणींकडे त्याच मॉडेलचा मोबाइल फोन असल्याचे पाहिल्यानंतर तिलाही तो मोबाइल हवा होता. मात्र, मुलीची आई रोजंदारीवर काम करत असल्याने महागडा मोबाइल फोन घेणे तिला परवडणारे नव्हते. त्यामुळे मोबाइल फोनच्या मागणीवरून आई आणि मुलीमध्ये सातत्याने वाद होत होते.

हेही वाचा : पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट, बापाने लेकाला गळा दाबून संपवलं; आईने काय केलं बघाच...

मुलगी आपल्या बेडरूममध्ये गेली आणि आतून दरवाजा बंद.. 

गुरुवारी याच मुद्द्यावरून आई आणि मुलीमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मुलगी आपल्या बेडरूममध्ये गेली आणि आतून दरवाजा बंद केला. काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी तिची चौकशी केली असता ती खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. महागडा स्मार्टफोन घेण्याच्या मागणीवरून आईसोबत झालेला वाद आणि त्यानंतर घडलेली ही घटना असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.