Crime News : भाजप नेत्याच्या सुनेनं राहत्या घरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधातून महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या कथित प्रेयसीला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली. ही घटना गुजरातच्या सूरत येथील असून घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : खारघर : भाजपच्या कार्यकर्त्याकडे एसआयआरचे फॉर्म, नागरिकाने पकडलं, पुढे...
भाजपच्या महिला नेत्यानं संपवलं जीवन
घडलेल्या घटनेनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेची निधी सिंह अशी ओळख समोर आली आहे. त्या सूरतच्या स्थानिक नेत्या शशी सिंह यांच्या सून होत्या. त्या पळसाणा येथील कडोदरा भागातील असलेल्या श्रीनिवास सोसायटीत सासरच्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यामुळे निधीच्या मृतदेहाचे ‘पॅनेल पोस्टमार्टम’ करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती.
मृत निधीच्या भावाने पोलीस ठाण्यात केली तक्रार
शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी मृत निधीच्या भावाने पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची तक्रार नोंदवली होती. पतीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासाला कंटाळून निधीने टोकाचं पाऊच उचलल्याचं तक्रारीत नमूद केले. अशातच कडोदरा पोलिसांनी निधीचा नवरा सौरभ आणि त्याची कथितरित्या प्रेयसी इशा बॅनर्जी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
हे ही वाचा : महागडा स्मार्टफोन घेण्यावरून आईसोबत वाद; 15 वर्षीय मुलीचं भयंकर पाऊल
पोलिसांनी सौरभ आणि इशिता यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 108, 85 आणि 54 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम 108 आत्महत्येसाठी प्रवृत्तीशी संबंधित आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












