Crime News : एका इयत्ता नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या वेळातच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 ऑगस्ट रोजी दुपारी माध्यान्ह भोजनानंतर सहाव्या तासादरम्यान ही मुलगी शौचासाठी शाळा आवाराबाहेर गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
मानेवर सुरा ठेवून धमकी
आरोपीने पीडित मुलीच्या मानेवर सुरा ठेवून तिला धमकी दिली होती की, जर तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर तिच्यावर पुन्हा अत्याचार करून तिची हत्या केली जाईल. या घटनेनंतर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलगी शाळेत परतली आणि तिने एका शिक्षकाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची परिस्थिती पाहून शाळा प्रशासनाने तात्काळ तिची मदत करत तिचे कपडे बदलले आणि लगेचच तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप
शाळेत काय घडलं?
या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे शाळा प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन समितीनेही स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा : निवडणुका झाल्या तर ठाकरे-शिंदे-पवारांना किती जागा?
आरोपी सापडणार का?
या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी सांगितले की, पालकांच्या व शाळा प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या शाळेच्या परिसरातील आणि मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) व मोबाईल लोकेशनची सखोल तपासणी करत आहेत. या तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
ADVERTISEMENT












