निवडणुका झाल्या तर ठाकरे-शिंदे-पवारांना किती जागा?
महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर ठाकरे, शिंदे आणि पवार गटांना किती जागा मिळतील? नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे काय सांगतो आणि मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे? ठाकरे विरुद्ध शिंदे आणि शरद पवार विरुद्ध सत्ताधारी गट अशी रंगलेली लढत कोणाच्या पथ्यावर पडणार?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातल्या पक्षांचं काय होणार?
निवडणुका झाल्या तर ठाकरे-शिंदे-पवारांना किती जागा?
MOTN Survey : इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या ताज्या 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत सध्या निवडणुका झाल्यास सत्ताधारी एनडीएला मोठा फायदा होताना दिसत आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला 31 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे, तर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागू शकते. शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक प्रश्नांवरून लोकांमध्ये नाराजी असली, तरी त्याचा थेट राजकीय फटका एनडीएला बसण्याऐवजी पुन्हा एकदा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने जनमत कौल देताना दिसत आहे.
मविआमध्ये काँग्रेसला सर्वाधिक फायदा
सर्व्हेतील पक्षनिहाय आकडेवारीनुसार महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. मविआच्या 17 जागांपैकी तब्बल 11 जागांवर काँग्रेस विजय मिळवेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळून अवघ्या 6 जागांवरच यश मिळू शकते. खासदार फुटणे आणि पक्षातील गळतीमुळे मविआच्या प्रादेशिक पक्षांना बसलेला फटका स्पष्टपणे दिसून येत आहे. यासोबतच, निवडून आल्यानंतर लोक पक्ष बदलतात या परसेप्शनमुळे पक्षांतरबंदी कायदा अधिक बळकट केला पाहिजे, असे 64 टक्के नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.
हे ही वाचा : खारघर : भाजपच्या कार्यकर्त्याकडे एसआयआरचे फॉर्म, नागरिकाने पकडलं, पुढे...
भाजपचे वर्चस्व अधोरेखित
दुसऱ्या बाजूला महायुतीत (एनडीए) भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. एनडीएच्या 31 जागांपैकी एकट्या भाजपला 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित 14 जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळू शकते. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच मोठी राजकीय स्थिती दर्शवणारी आकडेवारी असून, महायुतीत शिंदे-पवार गटाची ताकद टिकून असली तरी भाजप हाच सर्वात मोठा आणि भक्कम घटक पक्ष ठरताना दिसत आहे.
हे ही वाचा : Personal Finance: Home Loan घेताना लोक करतात या 5 मोठ्या चुका...
प्रत्यक्ष निवडणुकीत समीकरणे बदलणार?
तथापि, 2029 किंवा आगामी निवडणुकांपर्यंत हेच चित्र कायम राहील असे ठामपणे सांगता येत नाही, कारण या सर्वेक्षणात अनेक 'जर-तर'चे घटक समाविष्ट आहेत. सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' चिन्हाचा प्रलंबित निर्णय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील हालचाली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राजकीय सक्रियता यांसारखे अनेक मुद्दे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकतात. त्यामुळे सध्या एनडीएला स्पष्ट आघाडी दिसत असली, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत ही समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
