Personal Finance: Home Loan घेताना लोक करतात या 5 मोठ्या चुका...

रोहित गोळे

Home Loan घेताना केलेल्या छोट्या चुका तुमच्यावर लाखो रुपयांचं अतिरिक्त व्याज लादू शकतात. Loan Amount, EMI, Interest Rate, Tenure आणि Prepayment बाबत या 5 चुका टाळा.

ADVERTISEMENT

personal finance home loan 5 common mistakes avoid extra interest
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
Google CTA

Personal Finance for Home loan: घर घेणं हे प्रत्येकाचं मोठं आर्थिक स्वप्न असतं. मात्र, घराच्या किमती पाहता बहुतांश लोकांना Home Loan घ्यावा लागतो. Home Loan घेताना फक्त बँकेकडून किती कर्ज मिळतं आणि EMI किती आहे, एवढंच पाहणं पुरेसं नाही. Interest Rate, Loan Tenure, Processing Charges, Prepayment आणि स्वतःची आर्थिक क्षमता यांचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे.

अनेकदा Home Loan घेताना केलेल्या छोट्या चुका पुढील 15 ते 25 वर्षांत लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार निर्माण करू शकतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी या 5 चुका नक्की टाळा.

1. फक्त कमी EMI पाहून मोठं कर्ज घेणं

Home Loan घेताना अनेक जण सर्वात आधी EMI किती येईल हे पाहतात. मात्र, कमी EMI म्हणजे स्वस्त कर्ज असं नाही.

उदाहरणार्थ, कर्जाचा कालावधी वाढवल्यास मासिक EMI कमी होऊ शकते; पण त्याचवेळी तुम्ही अनेक वर्षे व्याज भरत राहता.