'मला त्याचं हृदय बाहेर काढायचं होतं..' लहानपणी आई-वडिलांना मारहाण होताना पाहिलं, 20 वर्षांनी उगवला भयानक सूड

एक तरुण वीस वर्षांपासून सूडाच्या आगीत जळत होता. संधी मिळताच अखेरीस त्याने आपला बदला पूर्ण केला. सूडाची ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

08 Apr 2026 (अपडेटेड: 08 Apr 2026, 01:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मला त्याचं हृदय बाहेर काढायचं होतं..

point

20 वर्षांपूर्वी आई-वडिलांना मारहाण होताना पाहिलं होतं

point

आता उगवला भयानक सूड

Crime News : अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. 20 वर्षांपासून मनात धगधगत असलेल्या सूडाच्या आगीने एका तरुणाला गुन्हेगार बनवले. 23 वर्षीय अनिल शुक्ला उर्फ मनजी याने एका माजी एअरफोर्स सार्जंटवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटत असली तरी, त्यामागे दडलेले दुःख आणि द्वेष अत्यंत दाहक आहे. आरोपीने हा हल्ला अचानक केला नसून, लहानपणी आपल्या डोळ्यांदेखत आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्याने दोन दशके प्रतीक्षा केली होती. बिहारमधील आरा परिसरातील ही घटना आहे. 

हे वाचलं का?

20 वर्षांपूर्वीचा बदला

मंगळवारी (7 एप्रिल) दुपारी आरा येथील शांती नगर भागात जेव्हा किंकाळ्या ऐकू आल्या, तेव्हा स्थानिकांना तो सामान्य वाद वाटला. मात्र, सत्य समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनिलच्या म्हणण्यानुसार, 20 वर्षांपूर्वी संपत्तीच्या वादातून त्याच्या भावांना आणि 80 वर्षांच्या आजोबांना विवस्त्र करून कोड्यांनी मारहाण करण्यात आली होती, तर त्याच्या आईला स्वयंपाकघरात डांबून ठेवले होते. त्यावेळी छतावर लपून आपल्या भावांच्या किंकाळ्या ऐकणाऱ्या चिमुरड्या अनिलच्या मनात सुडाची भावना घर करून बसली होती. 

हे ही वाचा : पुणे : बाळाच्या सततच्या रडण्याला वैतागली, आईने 11 महिन्यांच्या बाळाला मारुन टाकले विहिरीत

असा केला हल्ला

या सूडाच्या वेडापायी अनिलने आपले करिअर आणि वैयक्तिक आयुष्यही पणाला लावले होते. त्याने लग्न केले नाही की कोणतीही नोकरी टिकवून धरली नाही. तो वेगवेगळ्या राज्यांत कामाला जायचा, पण संधी मिळताच नोकरी सोडून आपल्या लक्ष्याचा माग काढण्यासाठी (रेकी करण्यासाठी) आरा येथे येत असे. मंगळवारी संधी मिळताच त्याने एका वृद्धाकडून मागून घेतलेल्या चाकूने अरविंद यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात अरविंद उपाध्याय यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्या आतड्यांना मोठी इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : DRDO Recruitment 2026 : फ्रेशर्ससाठी डीआरडीओमध्ये संधी, अप्रेंटिससाठी सुरु झालीये भरती; लगेच अर्ज करा

स्वत:हून पोलिसात हजर

विशेष म्हणजे, या थरारानंतर आरोपी अनिल शुक्ला स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपला गुन्हा मान्य केला. "मला या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही, आता जेलच माझे घर आहे," असे त्याने पोलिसांसमोर निर्भयपणे सांगितले. दुसरीकडे, जखमीच्या कुटुंबीयांनी जुन्या वैमनस्याचा कोणताही इतिहास नसल्याचा दावा केला आहे. मात्र, आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबामुळे पोलीस आता या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. लहानपणी पाहिलेली हिंसा आणि छळ एखाद्या मुलाच्या मानसिकतेवर किती खोलवर परिणाम करू शकतो, याचे हे विदारक उदाहरण आहे.