भयंकर.. डिलिव्हरीनंतर महिला रुग्णालयातून बेपत्ता, 24 तासाने नाल्यात सापडला मृतदेह!

मुंबई तक

09 Nov 2023 (अपडेटेड: 09 Nov 2023, 02:29 PM)

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर 24 तासांनी त्या महिलेचा मृत्यू मेडिकल कॉलेजच्या नाल्यात सापडला होता. त्यामुळे आता मेडिकल कॉलेज प्रशासनावर कुटुंबीयांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

banda uttar Pradesh, woman who had come to give birth in a medical college went missing

banda uttar Pradesh, woman who had come to give birth in a medical college went missing

follow google news

UP Crime: उत्तर प्रदेशमधील बांदा मेडिकल कॉलेजमध्ये (Banda Medical College) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एक महिला प्रसूतीनंतर बेपत्ता (Missing Case) झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार करून चौकशीचीही मागणी केली आहे. ही घटना घडल्याच्या 24 तासांनंतर महिलेचा मृतदेह (Dead Body) मेडिकल कॉलेज कॅम्पसच्या नाल्यात सापडला होता. त्यामुळे आता कुटुंबीयांनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

मुलीचाही झाला होता जन्म

राणी दुर्गावती मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये हे प्रकरण घडले आहे. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, महिलेला 3 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ऑपरेशन करुन महिलेने मुलीचा जन्म दिला होता. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी जेव्हा तिच्या बेडवर पाहण्यात आले तेव्हा, बेडवर फक्त नवजात मुलगी होती. मात्र महिला बेपत्ता होती.

हे ही वाचा >>पत्नीने पतीला चोपलं, घरात कोंडलं… महिलेने का केला एवढा राडा?

मेडिकल कॉलेजवरच गुन्हा

ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांचा गोंधळ उडाला. त्यानंतर कुटुंबीयांनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे महिला बेपत्ता असल्याची तक्रार केली. मात्र त्यावेळी त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांची भेट घेऊन प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरेही बंद

महिला बेपत्ता झाल्याचे घटना घडल्यानंतर महिलेचा शोध  घेण्यात येऊ लागला. मात्र गुरुवारी दुपारी कॅम्पसमधील नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांनी प्रशासनावर राग व्यक्त करत मेडिकल कॉलेजच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून मेडिकल कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.

मानसिक संतुलन बिघडले

औषधांच्या अतिमारा झाल्यामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या मोठ्या रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा मिळतील यासाठी आम्ही येथे दाखल केले होते. मात्र इथे दाखल करुन आम्ही मोठी चूक केली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार कारवाई

या प्रकरणी पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, अंतुवा गावातील ही महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. मात्र ती बुधवारपासून बेपत्ता झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच तिचा तपास सुरु करण्यात आला. तर 24 तासानंतर महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे आता कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp