दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराला संपवलं; विवाहित महिलेचं कृत्य, पोलिसही चक्रावले

Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये 1 फेब्रुवारी रोजी एका तरुणाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता. पोलिसांनी तपास केला असता, हा मृतदेह जीवन उर्फ संजीव नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. 32 वर्षीय संजीवची हत्या नेमकी कोणी केली, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. आता मुझफ्फरनगर पोलिसांनी या हत्येचा खळबळजनक खुलासा केला असून, तो ऐकून सर्वच हादरले आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 11:20 AM • 03 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराला संपवलं

point

विवाहित महिलेचं कृत्य

Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये 1 फेब्रुवारी रोजी एका तरुणाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता. पोलिसांनी तपास केला असता, हा मृतदेह जीवन उर्फ संजीव नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. 32 वर्षीय संजीवची हत्या नेमकी कोणी केली, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. आता मुझफ्फरनगर पोलिसांनी या हत्येचा खळबळजनक खुलासा केला असून, तो ऐकून सर्वच हादरले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलीने रॅपिडो बुक केली; रस्त्यात चालकाने केला बलात्कार, नेमकं काय घडलं?

12 वर्षांचं प्रेम अन् शेवट मृत्यूने

संजीवची हत्या त्याची विवाहित प्रेयसी सोनियानेच केली होती. संजीवसोबत तिचे गेल्या 12 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान तिचं लग्न दुसऱ्या तरुणाशी झालं, मात्र संजीवसोबतचं तिचं नातं तुटलं नव्हतं. याच काळात सोनियाचे तिच्या सासरच्या घराशेजारी राहणाऱ्या सादिक नावाच्या तरुणाशीही संबंध निर्माण झाले. जेव्हा सादिकला समजलं की सोनियाचे संजीवसोबतही संबंध आहेत, तेव्हा त्यानं सोनियासोबत मिळून संजीवला संपवण्याचा कट रचला आणि दोघांनी मिळून त्याचा काटा काढला.

सोनियानं पहिल्या प्रियकराला कसं संपवलं?

सोनियाने आपला पहिला प्रियकर संजीवला घरी बोलावलं. तिथं तिचा दुसरा प्रियकर सादिक आधीच हजर होता. त्यानंतर दोघांनी संधी मिळताच संजीवचा गळा दाबून त्याला ठार मारलं. त्यानंतर त्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून घराशेजारील एका नाल्यात फेकून दिला. मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं की, तो आपल्या एका मैत्रिणीला भेटायला गेला होता. त्यावरुन पोलिसांनी सोनियाला ताब्यात घेतलं. तिची कसून चौकशी केली असता तिनं गुन्ह्याची कबुली दिली.

हे ही वाचा : लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत उडी मारत तरुणीनं संपवलं जीवन, कारण आलं समोर

लग्नानंतरही दोन्ही प्रियकरांशी संबंध

सोनियाने सांगितलं की, तिचं सासर हरसोली गावात आहे. तिथं तिचे सादिकशी संबंध निर्माण झाले होते. सादिक गोव्यात शिवणकाम करायचा. मात्र, लग्नापूर्वीपासूनच तिचे संजीव उर्फ जीवनसोबत प्रेमसंबंध होते. या जुन्या संबंधांची माहिती सादिकला मिळाली होती. तो गोव्याहून परतला आणि त्यानं संजीवला संपवण्याचा कट रचला. हे प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावून गेले. मात्र पोलिसांनी 24 तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपी सोनिया आणि तिचा प्रियकर सादिक या दोघांना अटक केली.

    follow whatsapp