आधी तिन्ही मुलांना फासावर लटकवलं आणि नंतर आईने प्यायलं डीझेल... नेमकं काय घडलं?

घरात तीन अल्पवयीन मुलांचा फाशीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांच्या आईने आधी आपल्या मुलांची निर्घृण हत्या केली आणि नंतर त्यांचा मृतदेह फासावर लटकवला.

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:20 PM • 03 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी तिन्ही मुलांना फासावर लटकवलं

point

नंतर आईने प्यायलं डीझेल...

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: घरात तीन अल्पवयीन मुलांचा फाशीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांच्या आईने आधी आपल्या मुलांची निर्घृण हत्या केली आणि नंतर त्यांचा मृतदेह फासावर लटकवला. इतकेच नव्हे तर, मुलांच्या हत्येनंतर आरोपीने स्वत: डीझेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटनाही कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यात घडली असून संबंधित महिलेची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

मुलांना फासावर लटकवलं अन् आत्महत्येचा प्रयत्न...   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1:30 च्या दरम्यान घडली. आरोपी महिलेने आधी तिच्या मुलांना फाशीवर लटकवलं आणि नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये, मुलांचा जागीच मृत्यू झाला, तसेच महिला गंभीर अवस्थेत असल्याकारणाने तिला बागलकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची प्रकती सध्या नाजूक असल्यामुळे तिचा जबाब नोंदवला गेला नाही. प्रकृतीत सुधार झाल्यानंतर, तिची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान, महिलेचा पती हनुमंत घटनेच्या वेळी घरी उपस्थित नसल्याचं समोर आलं. त्यावेळी, तो आपल्या आईला मंदिरात सोडून शेतात गेला होता. दुपारी जवळपास 2:00 वाजताच्या सुमारास तो घरी परतल्यानंतर, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला आणि आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा: विवाहित प्रियकराने पत्नीसोबत मिळून केली लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या; हत्येनंतर डोकं ठेचलं अन् कपडे सुद्धा...

किरकोळ कारणावरून वाद 

वृत्तानुसार, घटनेच्या आदल्या रात्री घरात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. सासू आणि सुनेमध्ये हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. आठ वर्षांपूर्वी संबंधित जोडप्याचं लग्न  झालं होतं. सध्या, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पीडितेने कौटुंबिक वादातून की मानसिक दबावातून हे टोकाचं पाऊल उचललं? याचा पोलीस तपास करत आहेत. 

    follow whatsapp