विवाहित प्रियकराने पत्नीसोबत मिळून केली लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या; हत्येनंतर डोकं ठेचलं अन् कपडे सुद्धा...

मुंबई तक

• 11:24 AM • 03 Feb 2026

तरुणाने आपल्या पत्नीसोबत मिळून प्रेयसीचा खून केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर मृत तरुणीची ओळख लपवण्यासाठी तिचं डोकं चिरडण्यात आलं आणि मृतदेहावरील कपडे सुद्धा काढण्यात आल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय?

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहित प्रियकराने पत्नीसोबत मिळून केली लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या

point

लव्ह ट्रँगलमधून भयानक घटना

Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे लव्ह ट्रँगलमधून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे तरुणाने आपल्या पत्नीसोबत मिळून प्रेयसीचा खून केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर मृत तरुणीची ओळख लपवण्यासाठी तिचं डोकं चिरडण्यात आलं आणि मृतदेहावरील कपडे सुद्धा काढण्यात आल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्याच लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केली. संबंधित आरोपी विवाहित असून त्याला तीन मुलं देखील आहेत. 

नेमकं काय घडलं? 

30 जानेवारी रोजी गोरखपूरच्या पीपीगंज पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला. तिचे डोकं ठेचलं होतं आणि तिच्या शरीरावर कपडे देखील नव्हते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं अवघड होतं. ही महिला जवळपास 35 वर्षांची होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यात एक ऑटोचालक दिसला. चौकशीदरम्यान, त्याने दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन लोकांना आणल्याचं सांगितलं. तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विजय साहनी हा मुंबईतील एका खाजगी विमा कंपनीत काम करत होता. 2012 मध्ये तो कामानिमित्त पहिल्यांदा प्रिया शेट्टी नावाच्या महिलेशी भेटला. त्यानंतर, त्यांची जवळीक वाढत गेली आणि तो प्रियासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. दरम्यान, दोघांनीही एका मंदिरात लग्न केलं. प्रियाला 13 ते 14 वर्षांचा एक मुलगाही होता. मुलाच्या जन्मानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दरम्यान, तो प्रियापासून वेगळा झाला आणि त्याने मुंबईतील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिकाही दाखल केली होती. 

हे ही वाचा: नांदेड हादरलं! सत्तेच्या खुर्चीसाठी पोटच्या मुलीचा काढला काटा; 6 वर्षांच्या चिमुकलीला तेलंगणाला नेलं अन्...

2014 मध्ये कुटुंबियांनी विजयचं लग्न संध्याशी लावून दिलं. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीसह मुंबईला गेला. मात्र, त्यावेळी प्रिया आरोपीच्या संपर्कात आली आणि त्यांच्यात बोलणं सुरू झालं. तो तिच्यासोबत दोन महिने बाहेर राहिला. दरम्यान, विजयची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांना विजय आणि प्रियाच्या नात्याबद्दल कळलं. या काळात, प्रियाने आपल्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. आरोपी विजय 26 जानेवारी रोजी त्याची पत्नी संध्या आणि प्रेयसी प्रिया शेट्टीसह गोरखपूरला पोहोचला. त्यावेळी, त्याने त्याच्या पत्नी आणि प्रेयसीसोबत दारूची पार्टी केली. पार्टीत प्रियाने खूप दारू प्यायली आणि तिने विजयला धमकी दिली की, "जर माझे काही वाईट झाले तर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी करेन." 

हे ही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?

आरोपी विजयने 29 जानेवारी रोजी संध्याकाळी गोरखपूरहून एक ऑटो बुक केली आणि पत्नी तसेच प्रेयसीसोबत तो पीपीगंजला निघाला. वाटेत त्याने ऑटो चालकाला देखील दारू पाजली. पीपीगंजमध्ये पोहोचल्यानंतर, त्याने त्याची पत्नी संध्या आणि प्रियाला स्कूटरवर बसवलं. वाटेत तिघांनीही एका ठिकाणी पुन्हा दारू प्यायली. त्यावेळी, प्रियाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, म्हणून संध्याने तिला कसंतरी शांत केलं. वाटेत बरघट्टा पूल होता. तिथे पत्नीच्या सांगण्यावरून विजयने प्रियाचा गळा जोरात दाबला. प्रेयसीची निर्घृण हत्या केल्यानंतर विजयने त्याच्या पत्नीसह प्रियाचा मृतदेह पुलाच्या 20 फूट खाली नेला. त्यांनी तिची ओळख लपवण्यासाठी आधी चेहरा विद्रूप केला आणि नंतर तिचे कपडे देखील काढले.