आई गावाला गेली अन् इकडं बापाने 14 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार, धाकट्या बहिणीला वाचवण्यासाठी बघा काय केलं?

मुंबई तक

• 01:30 PM • 03 Feb 2026

Crime News : मुलगी आणि बापाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःच्या वडिलांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. आई गावाला गेल्याचा फायदा बापाने घेतला. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आई गावाला गेली अन् इकडं बापाने 14 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

point

धाकट्या बहिणीला वाचवण्यासाठी बघा काय केलं?

Crime News : मुलगी आणि बापाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःच्या वडिलांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. आई गावाला गेल्याचा फायदा बापाने घेतला. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या पहाडगंज भागातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : आधी तिन्ही मुलांना फासावर लटकवलं आणि नंतर आईने प्यायलं डीझेल... नेमकं काय घडलं?

आई गावाला गेल्याचा घेतला फायदा

पीडित मुलगी आठवीत शिकत आहे. तिची आई काही कामानिमित्त 15 दिवसांपासून बिहारला गेली होती. याचा फायदा घेत सैतान बापाने डाव साधला. 31 जानेवारीच्या रात्री पीडिता, तिची धाकटी बहीण आणि बापासोबत झोपली होती. तेव्हा सैतान बापाने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेने विरोध केला असता बापाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

धाकट्या बहिणीच्या सुरक्षेसाठी उचलले पाऊल

पीडितेने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या 10-15 दिवसांत तिच्यासोबत 4 ते 5 वेळा अशा प्रकारची घटना घडली होती. वडील तिला आणि तिच्या आईला आधीही अमानुषपणे मारहाण करायचे, त्यामुळे ती भीतीने गप्प होती. मात्र आता तिला आपल्या धाकट्या बहिणीच्या सुरक्षेची चिंता वाटू लागल्याने तिने हिंमतीने पोलिसांना सर्व सत्य सांगितले.

हे ही वाचा : आई-वडिलांचा वाद; अल्पवयीन मुलाचा विळ्याने गळा चिरला, नराधम बाप कुठं लपला?

बापाने दिली गुन्ह्याची कबुली

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पहाडगंज पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत सैतान बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून  तिचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन पीडितेचे कपडे, बेडशीट आणि इतर फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे.