'नवऱ्याच्या नोकरीसाठी 5 लाख आण..' बीडमध्ये विवाहितेसोबत घडलं भयंकर

मुंबई तक

19 Aug 2026 (अपडेटेड: 19 Aug 2026, 12:43 PM)

माहेरहून नवऱ्याच्या नोकरीसाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ सुरु होता. या छळाला कंटाळून बीडमधील विवाहितेने आत्महत्या केली आहे.

Beed Dowry Death

Beed Dowry Death

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'नवऱ्याच्या नोकरीसाठी 5 लाख आण..'

point

विवाहितेसोबत घडलं भयंकर

Beed Dowry Death, रोहिदास हातागळे : बीडच्या घाटनांदूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 31 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे. नवऱ्याला नोकरी लावण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी सासरची मंडळींकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरु होता. दीक्षा अजित फुलारी असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

12 लाख रोख अन् 11 तोळं सोनं

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा यांचे लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे आहे. जून 2020 मध्ये घाटनांदूर येथील अजित बापुराव फुलारी याच्याशी त्यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबाने 12 लाख रुपये रोख आणि 11 तोळे सोने दिले होते. अजित याला लवकरच स्टेनोची नोकरी लागणार असल्याचे लग्नाआधी सांगण्यात आल्यामुळे दीक्षाचे लग्न त्याच्याशी लावून देण्यात आले होते; मात्र त्याला नोकरी लागली नाही.

हे ही वाचा : मनोज जरांगेंचा तगडा डाव, समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली

नवऱ्याच्या नोकरीसाठी पाच लाख

लग्नानंतर वर्षभरातच पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा सासरच्यांनी दीक्षाकडे लावला. पैसे न आणल्यामुळे तिला टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, उपाशी ठेवणे आणि बेदम मारहाण करणे सुरू झाले. इतकेच नव्हे तर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा अमानुष छळ केला जात होता. सासरच्या मंडळींच्या या सततच्या जाचाला आणि छळाला कंटाळून अखेर दीक्षा हिने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

हे ही वाचा : 'बरमुडा घालून सिंहगडावर का आलात?' संस्कृती रक्षकांकडून मारहाण

नवरा, सासू-सासरा अन् नणंद

याप्रकरणी मयत विवाहितेचे भाऊ रोहित फुलारी यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी पती अजित बापुराव फुलारी, सासू सत्यभामा उर्फ चंचला बापुराव फुलारी, सासरे बापुराव लक्ष्मण फुलारी आणि नणंद शुभांगी उर्फ सोनी नामदेव फुलारी (सर्व रा. घाटनांदूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.