शिक्षकाने विद्यार्थीनीचे नग्न फोटो काढले, 15 दिवसांपासून जेवण सोडलं, गेली 10 महिन्यांपासून...

Beed Crime News : शिक्षकाने खासगी क्लासमध्ये इयत्ता 11 च्या विद्यार्थीला चुकीचा स्पर्श करत तिच्यासोबत गैरवर्तन केलं. एवढंच नाहीतर संबंधित शिक्षकाला असह्य झाल्याने पीडितेनं गेली 15 दिवसांपासून जेवन केलं नाही.

beed crime news

beed crime news

मुंबई तक

28 Jun 2025 (अपडेटेड: 28 Jun 2025, 12:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये गुरू शिष्याचा नात्याला काळीमा

point

पीडितेनं 15 दिवसांपासून जेवन केलं नाही

Beed Crime News : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने खासगी क्लासमध्ये इयत्ता 11 च्या विद्यार्थीला चुकीचा स्पर्श करत तिच्यासोबत गैरवर्तन केलं. एवढंच नाहीतर संबंधित शिक्षकाला असह्य झाल्याने पीडितेनं गेली 15 दिवसांपासून जेवन केलं नाही. रात्रीच्या सुमारास अचानक दचकून जागी व्हायची. हा प्रकार पाहून तिच्या आईला विश्वास बसत नव्हता की हे नेमकं काय चाललंय? या प्रकरणात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या शोधमोहिमेसाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : अडीच वर्षाच्या मुलाला दाम्पत्यांकडून चटके आणि वेताचे फटके, कारण ऐकून थक्का व्हाल

प्रकरण काय?

30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघेही पीडितेला शिकवणी संपल्यानंतर एक केबिलमध्ये घेऊन जायचे आणि तिच्यासोबत जबरदस्ती अश्लील कृत्य करायचे. यामुळे आता पीडित तरुणी ही तणावग्रस्त आहे. पीडितेच्या पालकांनी शिक्षकांना याबाबत विचारलेअशता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

यानंतर पालकांनीच आपल्या मुलीला विचारले. त्यानंतर तरुणीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तरुणीच्या पालकांनी गुरूवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा : Personal Finance: तुमचं महिन्याचं बजेट असं बनवा, मौजमजाही होईल आणि प्रचंड Investment सुद्धा!

या प्रकरणात आरोपीच्या शोधासाठी तीन पथकं दाखल करण्यात आली आहेत. तसेच क्लासेसजवळ गुन्हा दाखल होताच बंदोबस्त तैनात करण्यात आला अशी माहिती किशोर पवार, पोलीस निरीक्षक , बीड यांनी माहिती दिली आहे. 

दरम्यान, आतापर्यंत बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीचं सत्र कायम बघायला मिळत होतं. मात्र, आता बीडमध्ये महिला आणि तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
 

    follow whatsapp