Crime News : पोलीस दलाला हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या शिल्पा या महिला पोलीस कॉन्स्टेबलवर एका माथेफिरूने लोखंडाच्या रॉडने प्राणघातक हल्ला केला. ही घटना 26 ऑगस्ट रोजी पहाटे 5.10 वाजता घडल्याची माहिती मिळत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पीडित महिला कॉन्स्टेबल गरोदर असून तिच्यावर झालेला हा हल्ला पोलीस ठाण्याच्या आतच घडल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बेंगलोरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
'या' कारणामुळे चिडला आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार, 25 ते 30 वयोगटातील एक तरुण तक्रार नोंदवण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी ठाण्यात इतर पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कॉन्स्टेबल शिल्पा यांनी त्याला काही वेळानंतर येण्यास सांगितले, कारण त्यावेळी तक्रार घेणारा कर्मचारी उपलब्ध नव्हता. यावरून चिडलेला आरोपी काही वेळाने हातात लोखंडी रॉड घेऊन परत आला, ज्याला बॅरिकेडचे चाक जोडलेले होते. पोलीस ठाण्यात प्रवेश करताच त्याने शिल्पा यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
हे ही वाचा : 18 वर्षीय सुनिताचा मृतदेह तलावात आढळला, शरीराला बांधले दगड
प्रकृती चिंताजनक
आरोपीने अत्यंत हिंस्त्रपणे महिला कॉन्स्टेबलच्या डोक्यावर 7 ते 8 वेळा जोरदार वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात शिल्पा गंभीर जखमी झाल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना राजाजीनगर येथील सुगुणा रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या गरोदर असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : विवाहित प्रेयसीसोबत हॉटेलच्या खोलीत गेला अन् घडलं भयंकर, धक्कादायक प्रकार उघडकीस
आरोपीची काय होती तक्रार?
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीने हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणावरून केला आणि तो कसली तक्रार घेऊन आला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी बेंगलोर सिटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 109 (हत्येचा प्रयत्न) आणि कलम 132 (सरकारी कर्मचाऱ्याला कामापासून रोखणे किंवा हल्ला करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT












